मला भावतो श्रावण
आषाढाच्या पाठोपाठ
पाढा पहा श्रावणाचा
मला भावतो भावतो
झिम झिमत येण्याचा॥धृ॥
सवे घेऊन हा येतो
सण रक्षा बंधनाचा
सण भाऊ बहिणीचा
प्रेमानंदे वर्षण्याचा॥१॥
मला मोहवितो याचा
अहा हिरवा गालिचा
रंगीबेरंगी फुलांचा
वृक्ष फुलल्या वेलींचा ॥२॥
सप्तरंगी इंद्रधनु
छंद मला पाहण्याचा
झिमझिम सवे गाणे
सप्त सुरात गाण्याचा ॥३॥
बन फुलते मनाचे
क्षण तो ही रमण्याचा
ऊन पावसाचा याचा
खेळ आणि पाहण्याचा ॥४॥
तृणं पात्यांवरलेही
दवबिंदू पाहण्याचा
छंद अन् हिरवा हा
नयनात भरण्याचा॥५॥
–निसर्ग सखी सौ.मंगला रोकडे.
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…
मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…
This website uses cookies.