📚माय सावित्री ज्ञानाची📚
————————————-
नाही ठाऊक कोण ती
हरितालिका कोणाची
एक ठाऊक आम्हाला
माय सावित्री ज्ञानाची ॥धृ॥
माऊलीने ह्या दिधली
संजीवनी शिक्षणाची
नवी जीवन प्रणाली
आम्हा आणखी मानाची ॥१॥
माय साऊ साठीआली
स्फुर्ती नव्याने गाण्याची
आम्हा साठी ज्ञानेश्वरी
एक सावित्री ज्ञानाची ॥२॥
गीत गाता गाता येते
नवी उभारी मनाची
ज्ञानगंगा सावित्रीच
आम्हा ठाऊक ज्ञानाची ॥३॥
गती जोति-सावित्रीच्या
वाढवूया शिक्षणाची
अन्य ठाऊक न आम्हा
हरि तालिका कोणाची ॥४॥
— निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे
📚🙏📚 🌼 📚🙏📚
बुधवार, २९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…
मंगळवार, २८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…
सोमवार, २७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भामास्केट…
रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…
शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
This website uses cookies.