विधायक

कार्यकर्त्याने खड्डे बुजवून शासनाचे लक्ष वेधले… ● वाढदिवसानिमित्त गणेश बोत्रे यांचा अनोखा व विधायक उपक्रम..

कार्यकर्त्याने खड्डे बुजवून शासनाचे लक्ष वेधले…
● वाढदिवसानिमित्त गणेश बोत्रे यांचा अनोखा व विधायक उपक्रम..

महाबुलेटीन न्यूज
चाकण : खड्डयांमुळे वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोत्रे यांनी चाकण-तळेगाव रस्त्यावरील खड्डे बुजवून शासनाचे लक्ष वेधले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, पै. गणेश बोत्रे मित्र परिवार व गाथा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी देहू फाट्यापासून कडाचीवाडी पर्यंत रस्त्यावरील खड्डे व साईड पट्ट्या जेसीबीच्या साहाय्याने मुरूम टाकून बुजविल्या. व रोलर फिरवून लेव्हल काढण्यात आली.

चाकण-तळेगाव रस्त्यावर कडाचीवाडी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, खराबवाडी, म्हाळुंगे, खालुंब्रे, येलवाडी, सांगूर्डी, कान्हेवाडी तर्फे चाकण गावच्या हद्दीत मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक व नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. नागरिकांच्या या समस्येकडे बोत्रे यांनी प्राधान्याने लक्ष देऊन आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी हा अनोखा उपक्रम राबविला.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 23 Oct 2026

गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 दिवेआगर…

2 days ago

MahaBulletin — 22 Oct 2026

बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजगुरुनगरमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 20 Oct 2026

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…

5 days ago

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

6 days ago

MahaBulletin — 18 Oct 2026

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…

1 week ago

MahaBulletin — 13 Oct 2026

सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…

2 weeks ago

This website uses cookies.