कर्मयोगीचे सन २०२०-२१ या हंगामाचे ऊस लागवड धोरण जाहिर

महाबुलेटीन नेटवर्क / शैलेश काटे
इंदापूर : कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे सन २०२०-२१ या हंगामाचे ऊस लागवड धोरण सोमवारी जाहिर करण्यात आले. कर्मयोगीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्षा पद्मा भोसले यांनी संचालक मंडळासमवेेेत तशी घोषणा केली.
या संदर्भात माहिती देताना कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी सांगितले की, कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस वेळेत गाळप व्हावा, एकरी ऊस उत्पादन, साखर उताऱ्यात वाढ व्हावी, यासाठी संचालक मंडळाने मांजरी बुद्रुक येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राच्या सल्ल्यानुसार हे धोरण ठरवले आहे.
या हंगामासाठी दि.१५ जुलै २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान सभासदांनी ऊसाची लागवड करावी. ती पारंपरिक पद्धती ऐवजी पाच फूट एकेरी ओळपट्टा पद्धतीने केेेेली जावी. ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी कर्मयोगीच्या सेंद्रिय, गांडूळ व जिवाणू खतांचा  वापर करावा. लागवडीची नोंद देताना सातबारा उतारा देणे बंधनकारक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
ऊसाच्या इतर जातींपेक्षा को. सी. ६७१, व्ही.एस.आय. ४३४, एम.एस १०००१ या सुधारित ऊस जातींना ऊस तोडणीत प्राधान्य देण्यात येणार आहे, असे सांगून आडसाली ऊसाची लागवड दि.१४ जुलै ते ऑगस्ट २०२०, पूर्व हंगामी ऊस लागवड दि.१ सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२०, सुरू ऊस लागवड दि.१ डिसेंबर ते फेब्रुवारी २०२१ तर खोडवा गळीत हंगाम सन २०२०-२१ अखेर तुटलेल्या ऊसाचे क्षेत्र असे नियोजन करण्यात आल्याचे सुतार यांनी स्पष्ट केले.
admin

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

3 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

4 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

4 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

1 month ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 month ago

This website uses cookies.