कृषी

कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ बुधवारी तहसील कार्यालयावर शिवसेनेचे आंदोलन

 

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : लॉकडाऊनच्या काळात कवडीमोल भावाने आपला शेतमाल विकावा लागलेल्या शेतकऱ्यांना ह्या आठवड्यात कांद्याला ३ हजार ते ४ हजारपर्यंत उच्चांकी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी राजा समाधानी होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लादून शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेतला आहे.

या अन्यायकारक निर्णयाच्या निषेधार्थ शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार व शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीरावराव आढळराव पाटील व आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी व समस्थ शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत उद्या बुधवार, दिनांक १६ सप्टेंबर २०२० रोजी तहसील कार्यालय राजगुरुनगर, तालुका-खेड येथे सकाळी १०.३० वाजता भव्य आंदोलन करण्यात येणार आहे.
तरी खेड तालुका शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सोशल डिस्टन्स राखून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी केले आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 30 Apr 2026

बुधवार, २९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 30 Apr 2026

मंगळवार, २८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 28 Apr 2026

सोमवार, २७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भामास्केट…

6 days ago

MahaBulletin — 27 Apr 2026

रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…

7 days ago

MahaBulletin — 27 Apr 2026

शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…

7 days ago

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 week ago

This website uses cookies.