निवडणूक

कल्याणजी गायकवाड यांना स्वर मार्तंड पुरस्कार प्रदान

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर
आळंदी देवाची :
श्री संत एकनाथ महाराज मिशन यांच्या वतीने दिला जाणारा ‘ स्वर मार्तंड पुरस्कार ‘ आळंदी देवाची येथील कृष्णाई संगीत विद्यालयाचे संचालक भजनसम्राट, गायक गुरुवर्य कल्याणजी गायकवाड यांना श्री क्षेत्र पैठण येथे अयोध्येतील श्रीराम मंदिर समीतीचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंद गीरीजी महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन कीर्तनकार एकनाथ महाराज मिशनचे संस्थापक अध्यक्ष हभप. योगिराज महाराज गोसावी यांनी केले होते.

यावेळी भगवान गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री, भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषारजी भोसले, सुप्रसिद्ध कीर्तनकार अमृताश्रम स्वामी जोशी महाराज, तारकेश्वर गडाचे महंत हभप. आदिनाथ महाराज, पंढरपुर विठ्ठल रखुमाई संस्थानचे विश्वस्त हभप. जळगावकर महाराज, नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज, कीर्तनकार हभप. वारींगे महाराज मुंबई, कीर्तनकार भरतमहाराज, कीर्तनकार अशोकमहाराज पांचाळ आदी संत महंत मान्यवर उपस्थित होते.

मला मनापासून आनंद होतोय कारण हा पुरस्कार म्हणजे साक्षात श्री संत एकनाथ महाराज यांचेच आशीर्वाद आहेत, अशा शब्दात कल्याणजी गायकवाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

MahaBulletinTeam

Recent Posts

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

21 hours ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

3 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

5 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

6 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

This website uses cookies.