शैक्षणिक

महाबुलेटीन न्यूज : कलाशिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी मिलींद शेलार

 

महाबुलेटीन न्यूज
तळेगाव दाभाडे : महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ संलग्न पुणे जिल्हा कला शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी तळेगाव दाभाडे येथील मिलिंद शेलार यांची तर सचिवपदी संजय भोईटे यांची निवड‌ करण्यात आली आहे.

नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंद शेलार हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या देहूरोड येथील श्री शिवाजी विद्यालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर संजय भोईटे हे पुणे महानगरपालिकेच्या हडपसर येथील महात्मा फुले विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मिलींद शेलार हे महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे सहसचिव असून श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव, तर रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी. चे खजिनदार म्हणून काम पहात आहेत.

निवडीनंतर मिलींद शेलार म्हणाले,”कला शिक्षकांचे ए.एम. स्केल सारखे अनेक महत्वाचे प्रश्न शासनदरबारी प्रलंबित आहेत. ते सोडवण्यासाठी सर्व सहकारी आणि संघटनेच्या माध्यमातून प्रयत्नशील राहू. वेळप्रसंगी कला शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लोकशाही पध्दतीने आंदोलनाचा मार्ग स्वीकारू.”

पुणे जिल्हा कला शिक्षक संघाची कार्यकारिणी सभा नुकतीच पुणे येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी राज्य उपाध्यक्ष किरण सरोदे होते. सल्लागार हुसेन खान यांच्या उपस्थितीत
नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

● नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :-
अध्यक्ष – मिलींद शेलार, उपाध्यक्ष -श्याम साठे, माया म्याकल, वाहीद खान, नितीन गायकवाड, कार्याध्यक्ष – हेमंत नागवडे, सचिव – संजय भोईटे, सहसचिव -चंद्रकांत जोशी, खजिनदार – भागूजी शिखरे, सहखजिनदार – पांडुरंग नेवसे, महिला आघाडी प्रमुख – अस्मिता गुरव, जिल्हा संघटक गणेश होले.
——————————————

फोटो : अध्यक्षीय निवडीचे पत्र देताना डावीकडून हुसेन खान ,मिलींद शेलार, किरण सरोदे , श्याम साठे
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 12 Jun 2026

गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…

7 hours ago

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

1 day ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

2 days ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

1 month ago

This website uses cookies.