गुन्हेगारी

जुन्या वादातुन दारुचे नशेत मित्रांनी केला मित्राचा खुन, इंदोरीतील घटना

 

8 तासात नाशिक येथुन 3 आरोपींच्या आवळल्या मुसक्या,
गुन्हे शाखा, युनिट 5 व तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीसांची संयुक्त कामगिरी

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : जुन्या वादातुन दारुचे नशेत मित्रांनी आपल्या तरुण मित्राचा खुन केला असल्याची घटना इंदोरी येथील कॅडबरी कंपनी समोर घडली. पोलिसांनी 8 तासात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथुन 3 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हे शाखा, युनिट 5 व तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीसांची ही संयुक्त कामगिरी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 05/11/2020 रोजी रात्री 10.10 वाजणेचे सुमारास तळेगाव एम.आय.डी.सी. हद्दीतील मौजे इंदोरी गावातील कॅडबरी कंपनीचे समोर तरुण नामे गुरुदास उर्फ पिल्या सदाशिव तेलंग हा त्याचे दुचाकीवर जात असताना त्याचे मित्र बबन भापकर, देवेंद्र जाधव व नच्या शिंदे ( सर्व रा. इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे ) यांनी जुन्या वादाचे कारणावरुन धारधार शस्त्राने त्याचे चेहऱ्यावर व गळयावर गंभीर जखमा करुन खुन केला. याबाबत मयताचा भाऊ अमर सदाशिव तेलंग यांनी तळेगाव एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन येथे बबन भापकर, देवेंद्र जाधव व नच्या शिंदे यांचेविरुध्द फिर्याद दिली.

सदरबाबत तळेगाव एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. 124/2020 भारतीय दंड विधान कलम 302, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाळकृष्ण सांवत, गुन्हे शाखा, युनिट 5 यांनी पोलीस अंमलदार दत्तात्रय बनसुडे, राजेंद्र साळुंके, धनराज किरनाळे, श्यामसुंदर गुट्टे, ज्ञानेश्वर गाडेकर यांचे एक तपास पथक व श्री प्रदिप लोंढे, तळेगाव एम.आय.डी.सी. यांनी पोउपनि श्री राहुल कोळी, पोलीस अंमलदार प्रशांत सोरटे, अशोक आंबेकर, नंदकुमार चव्हाण, शंकर चिंचकर व नितीन तारडे यांचे एक तपास पथक असे आरोपीतांचा शोध घेणेकामी वेगवेगळी दोन तपास पथके तयार करुन त्यांना सुचना दिल्या व मार्गदर्शन केले.

सहा पोलीस निरीक्षक श्री राम गोमारे व पोलीस अंमलदार नागेश माळी, मयुर वाडकर यांनी त्यांना आरोपीबाबत मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करुन आरोपी बबन भापकर, देवेंद्र जाधव व नच्या शिंदे हे एका दुचाकी वाहनाने नाशिकचे दिशेने गेले असल्याचे समोर आले. मिळालेली माहिती वरील तपास पथकास सांगुन त्यांचे संपर्कात राहुन आरोपींबाबत वेळोवेळी माहीती देवुन त्यांना आरोपींचे मागावार नाशिक दिशेने पाठविण्यात आले.

तपास पथकाने आरोपींची माहिती मिळालेनंतर आरोपी पळुन जात असताना आरोपींचा 175 कि.मी. पाठलाग करुन अवघ्या 08 तासात सिन्नर जि नाशिक येथुन ताब्यात घेतले आहे. आरोपींकडे विचारपुस केली असता आरोपी नामे देवेंद्र जाधव व मयत गुरुदास उर्फ पिल्या तेलंग यांच्यात वर्षभरापुर्वी भांडण झाले होते, त्याचा राग मनामध्ये धरुन गुरुदास उर्फ पिल्या तेलंग याचा खुन करुन लपण्याकरीता नाशिक येथील मित्राकडे जात असल्याचे सांगितले.

आरोपी नामे 1. देवेंद्र नाना जाधव, वय 23 वर्षे रा इंदोरी ता मावळ जि पुणे 2. मयुर उर्फ नच्या अभिमान शिंदे, वय 21 वर्षे रा इंदोरी ता मावळ जि पुणे 3. शुभम संजय भापकर, वय 21 वर्षे रा इंदोरी ता मावळ जि पुणे यांना तळेगाव एम. आय. डी. सी. गु.र.क्र. 124/2020 भारतीय दंड विधान कलम 302, 34 अटक करण्यात आली असुन पुढील तपास तळेगाव एम.आय.डी.सी. कडील पोलीस करीत आहेत.

सदरची कामगिरी ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त मा.श्री कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे मा.श्री सुधिर हिरेमठ, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 02 श्री आनंद भोईटे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे मा.श्री राजाराम पाटील, सहा पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग श्री संजय नाईक-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5 पिंपरी चिंचवड चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.बाळकृष्ण सावंत, तळेगाव एम.आय.डी.सी. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रदिप लोंढे, सहा पोलीस निरीक्षक श्री.राम गोमारे, पोलीस उप निरीक्षक श्री राहुल कोळी व पोलीस अंमलदार दत्तात्रय बनसुडे, राजेंद्र साळुंके, धनराज किरनाळे, श्यामसुंदर गुट्टे, ज्ञानेश्वर गाडेकर नागेश माळी, मयुर वाडकर, प्रशांत सोरटे, अशोक आंबेकर, नंदकुमार चव्हाण, शंकर चिंचकर, नितीन तारडे, राजेंद्र शेटे, संदिप ठाकरे, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, सावन राठोड, गणेश मालुसरे, फारुक मुल्ला, भरत माने, राजकुमार इघारे, नितीन बहिरट, गोपाळ ब्रम्हांदे व राजेंद्र कदम यांनी केली आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

7 hours ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

This website uses cookies.