गुन्हेगारी

जुन्नरच्या आदिवासी भागात अल्पवयीन मुलीवर दोघांचा बलात्कार, तीन जणांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक, मुलीचे विवस्त्र छायाचित्र काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी

 

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची विवस्त्र अवस्थेतील छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन तरुणांसह त्यांना मदत करणारा त्यांचा मित्र अशा तीन जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ भगवान वाळुंज व करण शिवाजी वाळुंज ( दोघेही रा. तांबे ता. जुन्नर, जि. पुणे ) व आदित्य गुलाब कबड्डी ( रा. कबाडवाडी ) अशा तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीत पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या घरी जात असताना सौरभ व करण यांनी तिला अडवून जवळच्या शेतात जबरदस्तीने नेले व तिच्यावर या दोघांनी बलात्कार केला. तसेच करण याने तिचे विवस्त्र अवस्थेतील छायाचित्र आपल्या मोबाईलमध्ये काढुन झालेला प्रकार कोणाला सांगितल्यास तीचे फोटो समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्याची धमकी दिली. त्यानंतर हे दोघे तिथून आदित्यच्या दुचाकीवर बसून पसार झाले. याप्रकरणी संबधीत पीडितेने जुन्नर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. जुन्नर पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस कर्मचारी सागर हिले, अनिल लोहकरे, सुधीर काठे आदींनी तातडीने कारवाई करून यातील दोन आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे करत आहेत.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

7 days ago

This website uses cookies.