महाबुलेटीन न्यूज / आनंद कांबळे
जुन्नर : ‘शाळा बंद, पण शिक्षण चालू’ या उपक्रमा अंतर्गत समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बांगरवाडी बेल्हे, जुन्नर तालुका गणित व विज्ञान अध्यापक संघ यांचे संयुक्त विद्यमाने विविध विषयांवर वेगवेगळ्या व्याख्यात्यांची राज्यस्तरीय वेबसेमिनार्स आयोजित करून ‘शाळा बंद’ पण शिक्षण चालू’ हा उपक्रम चालू ठेवला. ह्यात ९ मार्गदर्शक व्याख्यात्यांची ७ वेबसेमिनार्स संपन्न झाली असून जुन्नर तालुक्यातून सर्वप्रथम अशा समाज उपयोगी वेबिनार्सचे आयोजन केले असल्याची माहिती जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रतिलाल बाबेल यांनी दिली.
सदर वेबिनारमध्ये पुणे येथील एन. सी. आर. ए. चे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर जे. के. सोळंकी ( करिअर घडविताना ), मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग माजी अध्यक्ष विनय र. र. ( घरोघरी प्रयोग शाळा ), लेखक प्रा. रविवरे ( छत्रपती शिवाजी महाराजांची शिवनीती ), युवा शास्रज्ञ अंकिता नगरकर ( वैज्ञानिक शोध व पेटंट ), ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञ डॉक्टर संजय कुमार रहांगडाले ( वनस्पतींचे मानवी जीवनातील महत्व ), इतिहास संशोधक डॉ. लहू गायकवाड( इतिहास गणिताचा ), माजी प्राचार्य म. ल. नानकर ( चला दोस्ती करूया गणिताशी ), कल्याण कडेकर ( शिष्यवृत्तीचा गुरुमंत्र ), प्रा. हेमंत महाजन ( जीवनात इंग्रजीचे महत्व ) आदींनी विद्यार्थी पालक, शिक्षक यांना मार्गदर्शन करून शंकांचे समाधान केले असल्याची माहिती समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले.
सदर राज्यस्तरीय वेबिनार मध्ये विविध जिल्यातील, तालुक्यातील नागरिकांनी सहभाग नोंदविला असून त्याचा फायदा हजारो विद्यार्थी, पालक व शिक्षकांना झाला आहे. हे विबिनार्स यशस्वी करण्यासाठी राज्य विज्ञान अध्यापक महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय आरोटे, जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रतीलाल बाबेल, गणित विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण ताजणे, विज्ञान संघाचे सचिव तानाजी वामन, विज्ञान संघाचे उपाध्यक्ष यशवंत दाते, सहसचिव दिलीप लोंढे, विरेंद्र काळे, आकाश भोर, समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बांगरवाडी बेल्हेचे प्रदीप गाडेकर, भूषण बो-हाडे यांनी प्रयत्न केले.
सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थी. पालक व शिक्षक यांच्यावरील ताणतणाव दूर करण्यासाठी अशा प्रकारच्या वेबिनारची गरज आहे. ह्यामुळे स्वतःमध्ये बदल करून तंत्रज्ञानआत्मसात करण्याची संधी सर्वाना उपलब्ध झाली आहे. ऑनलाइन शिक्षण सुरु असल्याने शाळा बंद पण शिक्षण चालू आहे, ही आशादायक गोष्ट आहे.
—–
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.