हनुमंत देवकर
चाकण एमआयडीसी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी चाकण एमआयडीसीतील सावरदरी ( ता. खेड ) येथील एअर लिक्विड ऑक्सिजन कंपनीला भेट देऊन ऑक्सिजन उत्पादन, उपलब्धता व पुरवठा याची माहिती घेतली.
ऑक्सिजनची उपलब्धता आणि पुरवठा याबाबत ही भेट होती. कोरोनाग्रस्त रुग्णांना अक्सिजन कमी पडू नये म्हणून ८५ टक्के ऑक्सिजन हा वैद्यकीय कारणास्तवच वितरित करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिल्या. आणि त्याप्रमाणे कार्यवाही सुद्धा सुरू आहे. तसेच ऑक्सीजन निर्मिती मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क करण्याच्या सूचना सुद्धा संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
यावेळी खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, तहसीलदार वैशाली वाघमारे, पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
—-
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.