प्रशासकीय

सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लागण्यासाठी ‘माझे संकलन, माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वपूर्ण : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

 

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘माझे संकलन, माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे, दि. 1 ऑक्टोबर : कोरोना आपत्ती निवारणाच्या कामासोबतच प्रलंबित तसेच दैनदिन कामकाज गतीने होण्यासाठी माझे संकलन, माझी जबाबदारी मोहिम राबविण्यात येत आहे, कोरोना विषयक कामकाजासोबतच इतर विकासकामे व सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लागण्यासाठी ‘माझे संकलन, माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात माझे संकलन, माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, कोरोना संसर्ग कालावधीत संपूर्ण प्रशासन कार्यरत आहे, त्यामुळे नागरिकांचे दैनदिन कामकाज प्रलंबित राहण्याची शक्यता विचारात घेत ‘माझे संकलन, माझी जबाबदारी’ मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माझे संकलन, माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत प्रलंबित कामे गतीने मार्गी लावा, तसेच कार्यालयातील कामकाजात सकारात्मकता ठेवून गुणवत्तापूर्ण काम करण्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न महत्त्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

झिरो पेंडन्सी अभियानाच्या माध्यमातून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने सातत्याने राज्यात आदर्श निर्माण केला असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, प्रत्येकाने आपल्या कार्यालयात येणा-या प्रत्येकाच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कार्यालयीन कामकाज सांभाळताना प्रशिक्षणाचा निश्चितच उपयोग होणार आहे. शासनाने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी टिम म्हणून काम करा. कोरोनासोबतच सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण सर्व मिळून काम करूया, यामध्ये प्रत्येकाचे योगदान गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख म्हणाले, दैनंदिन प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी ‘माझे संकलन, माझी जबाबदारी’ मोहिम उपयुकत् ठरणार आहे. प्रशिक्षण व क्षमता बांधणी, अभिलेख कक्षाचे अद्ययावतीकरण व कालबाहय अभिलेख, प्रलंबित टपाल कार्यविवरणाला नोंदवणे, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आढावा, सहा गठठा पदधती, टपालावरील प्रक्रिया, टिपणी सादर करण्याची पदधती यासोबतच ‘माझे संकलन, माझी जबाबदारी’ मोहिमे बाबत मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हयातील जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय प्रांत अधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी आभार मानले.

MahaBulletin Team

Recent Posts

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

4 hours ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

8 hours ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

This website uses cookies.