नाट्य/चित्रपट

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

जेष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
मुंबई : आपल्या अष्टपैलू गायकीनं तमाम संगीतप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजविणाऱ्या आशा भोसले (Asha Bhosale) यांना राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) जाहीर झाला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून याची घोषणा झाली आहे. राज्य सरकारकडून 1996 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. पहिला पुरस्कार महाराष्ट्रचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांना देण्यात आला. तर, दुसरा पुरस्कार 1997 मध्ये गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांना देण्यात आला होता. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळविणाऱ्या आशाताई ह्या मंगेशकर घराण्यातील दुसऱ्या व्यक्ती आहेत. 

आज ( 25 मार्च ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते. 

आशा भोसले यांना 2000-01 मध्ये चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर भारत सरकारने 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला होता. तर मध्य प्रदेश सरकारने त्यांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित केले. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने आज आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले. यापूर्वी आशा भोसले यांच्या ज्येष्ठ भगिनी लता मंगेशकर यांनाही महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

आशा भोसले यांचा अल्पपरीचय :-
—————————————
आशा भोसले यांचा जन्म 1933 साली झाला. आशा भोसले यांनी 2020 मध्ये वयाची 87 वर्षं पूर्ण केली.

● संगीत आणि नाटकाचा वारसा असलेल्या आशा भोसले यांनी लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. मिळालेल्या माहितीनुसार, आशा भोसले यांची कारकीर्द सुरू झाली 1943 साली. त्यानंतर 1948 मध्ये त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.

● आशा भोसले यांनी बॉलीवूडमध्ये सात दशकं अधिराज्य गाजवलंय. बॉलीवूडध्ये तब्बल 1000 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी प्ले-बॅक सिंगर म्हणून आवाज दिला आहे. बॉलीवूडमध्ये आशाताईंना ‘मेलडी क्वीन’ म्हणून ओळखलं जातं.

● आशा ताईंनी आत्तापर्यंत 11,000 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. आशा भोसले, 1943 पासून या क्षेत्रात आहेत. ज्यात त्यांनी 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी म्हटली आहेत.

● विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायल्यामुळे 2011 साली आशा भोसले यांचं गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं.

● आशा भोसले यांनी हिंदी, मराठी, बंगाली, तेलगू, तामिळ, इंग्रजी अशा भाषेत गाणी गायली आहेत.

● भोसले यांना 18 वेळा फिल्मफेअरसाठी नामांकन मिळालं होतं.

● कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेली ‘केव्हा तरी पहाटे’, ‘मलमली तारुण्य माझे’, ‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘मी मज हरपून बसले गं’ आणि आशा भोसले यांचा स्वर लाभलेली ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. 

दरम्यान, महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आतापर्यंत पु.ल. देशपांडे, लता मंगेशकर, विजय भटकर, सचिन तेंडुलकर, भीमसेन जोशी, अभय आणि राणी बंग, बाबा आमटे, रघुनाथ माशेलकर, रतन टाटा, र. कृ. पाटील, नानासाहेब धर्माधिकारी, मंगेश पाडगावकर, सुलोचना दिदी, जयंत नारळीकर, अनिल काकोडकर आणि बाबासाहेब पुरंदरे या मान्यवरांना देण्यात आला आहे.
———-

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 hours ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

This website uses cookies.