निधन वार्ता

जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे निधन…

जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे निधन..

महाबुलेटीन न्यूज 
पुणे : ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे (Shrikant Moghe) निधन झाले आहे. ‘वाऱ्यावरची वरात’ नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा अभिनेता शंतनू मोघे आणि प्रिया मराठे असा परिवार आहे. श्रीकांत मोघे यांनी साठहून अधिक नाटकांत आणि पन्नासहून अधिक चित्रपटांत काम केले आहे. ’पुलकित आनंदयात्री’ या एकपात्री प्रयोगासाठी श्रीकांत मोघे यांनी अमेरिका, युरोप, दुबई अशा ठिकाणचा दौरा केला आहे.  

श्रीकांत मोघे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्करवाडी येथे आणि इंटरपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन कॉलेजात झाले. बीएस्‌‍सीसाठी ते पुण्याच्या एस.पी. कॉलेजात आले. मुंबईला जाऊन त्यांनी बी. आर्च. ही पदवी घेतली. शाळेत असतानाच ते नाट्यअभिनयाकडे वळले. महाविद्यालयात शिकत असताना भालबा केळकर यांच्या ‘बिचारा डायरेक्टर’ या नाटकाचे दिग्दर्शनही श्रीकांत मोघे यांनी केले होते. त्यांनी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये ‘घराबाहेर’ तसेच आचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकांचे प्रयोग केले.
——

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 23 Mar 2026

रविवार, २२ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 आहिरे…

4 hours ago

MahaBulletin — 22 Mar 2026

शनिवार, २१ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 गॅस…

1 day ago

MahaBulletin — 21 Mar 2026

शनिवार, २१ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुणे-नाशिक…

2 days ago

MahaBulletin — 21 Mar 2026

शुक्रवार, २० मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 महिला…

2 days ago

MahaBulletin — 20 Mar 2026

गुरुवार, १९ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 भीषण…

3 days ago

MahaBulletin — 19 Mar 2026

बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…

4 days ago

This website uses cookies.