आरोग्य

जानेवारीपासून कोरोना लसीकरण : अदर पूनावाला, डिसेंबरमध्येच मिळेल परवानगी…

 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे, दि. 13 डिसेंबर : कोरोनाची लस कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. भारतात तीन औषध कंपन्यांनी आपल्या कोरोना लसीला आपत्कालीन मंजुरी मिळावी, यासाठी अर्ज केले आहेत. पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया सीरमने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्राझेनका कंपनीसह मिळून लस तयार केली आहे. लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी द्यावी, यासाठी ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडे अर्ज केला आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला म्हणाले, “सुरुवातीला देशाच्या किमान 20 ते 30 टक्के लोकसंख्येला लस देण्याच्या दृष्टीने केंद्रीय आरोग्य मंत्रालय नियोजन करत आहे. सरकारला जुलै 2021 पर्यंत लसीचे 30 ते 40 कोटी डोस हवे असल्याचेही पूनावाला यांनी म्हटले आहे.

नियंत्रक यंत्रणेची परवानगी मिळाली, तर भारताचा कोरोना लसीकरण कार्यक्रम जानेवारी 2021 मध्ये सुरू होऊ शकतो, असे अदर पूनावाला यांनी सांगितले.

आम्हाला इमर्जन्सी लायसन्स चालू महिन्याच्या अखेरपर्यंत मिळेल, पण लसीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यासाठीची परवानगी नंतर मिळेल. सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 पर्यंत प्रत्येक नागरिकाला पुरण्याएवढ्या लसी उपलब्ध होतील आणि आपले नेहमीचे जीवन सुरळीतपणे सुरू होईल, अशी आशाही पूनावाला यांनी व्यक्त केली.

कोविड-19 लशीच्या निर्मितीसाठी नोव्हावॅक्स कंपनीसोबत करार केल्याचेही त्यांनी सांगितले. 2021 च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत नोव्हाव्हॅक्सच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या पूर्ण होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

4 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

4 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

1 month ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 month ago

This website uses cookies.