क्रिकेट

IPL : आयपीएल लीगचा आजपासून धमाका सुरु,

पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क :
कोरोनादरम्यान आयपीएल प्रेक्षकांशिवाय यूएईत आजपासून सुरू होत आहे. आयपीएल सीजन-13 चे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केल्याप्रमाणे पहिला सामना चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान होईल. तसेच, फायनल 10 नोव्हेंबर म्हणजेच मंगळवारी असेल. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा फायनल रविवार ऐवजी मंगळवारी होत आहे. प्ले ऑफ आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. कारण हे दोन्ही संघ गतविजेते आणि उपविजेते आहेत. पण चेन्नई संघातील अन्य खेळाडूंची कोरोना चाचणीच्या रिपोर्टची वाट पाहण्यासाठी बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर करण्याचे टाळले होते.

या टूर्नामेंटमध्ये 10 डबल हेडर म्हणजेच एका दिवसात 2-2 मॅच होतील. संध्याकाळी होणारे सामने जुन्या शेड्यूलच्या अर्ध्या तासापूर्वी म्हणजेच, 7.30 पासून आणि दुपारचे सामना 3.30 वाजेपासून सुरू होतील.

आयपीएल गव्हर्निंग काउंसिलने कोरोनामुळे प्रत्येक टीमला फक्त 24 खेळाडू सोबत नेण्याची परवानगी दिली आहे. याआधी फ्रेंचाइजीला 25 खेळाडू ठेवण्याची परवानगी होती. टूर्नामेंटमध्ये अनलिमिटेड कोरोना सब्सटिट्यूटला मंजूरी देण्यात आली आहे. म्हणजेच, टूर्नामेंटमध्ये एखादा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास, टीम त्याजागी दुसरा खेळाडू मैदानात उतरवू शकते.

सर्व सामने तीन स्टेडियममध्ये होतील. आयपीएल मधील सर्व 60 सामने दुबई, अबुधाबी आणि शारजाहमध्ये खेळवले जाणार आहेत. भारतात आयपीएलचे सामने 8 ठिकाणी व्हायचे.

आयपीएलमध्ये शनिवारी आणि रविवारी दोन सामने ठेवण्यात येतात. यावर्षीही असेच सामन्यांचे आयोजन केले आहे. त्यामुळे जर दोन सामने होणार असतील, तर आयपीएलमधील पहिला सामना हा दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु करण्यात येणार आहे. यापूर्वी आयपीएलचे दुपारचे सामने चार वाजता सुरु व्हायचे. पण युएईमधील वेळा पाहून वेळापत्रकामध्ये हा बदल करण्यात आला आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 27 Apr 2026

रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…

59 minutes ago

MahaBulletin — 27 Apr 2026

शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…

59 minutes ago

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

This website uses cookies.