आरोग्य

मराठी पत्रकार परिषदेच्या ८२ व्या वर्धापन दिनानिमित्त हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या वतीने आरोग्य शिबीर, एड्स जनजागृती

जागतिक एड्स दिनानिमित्तवाहतूक पोलीस, रिक्षा चालक व पत्रकार बांधवांची एचआयव्ही टेस्ट
मास्क, सॅनिटायझर व आर्सेनिक आल्बम गोळ्यांचे वाटप

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चाकण : मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ खेड तालुका व चाकण ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार बांधवांसाठी आरोग्य शिबीर व जागतिक एड्स दिनानिमित्त एड्स जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. तसेच चाकण येथील वाहतूक पोलीस, पत्रकार बांधव व रिक्षा चालकांची मोफत एच. आय. व्ही. चाचणी करण्यात आली.

पत्रकार संघाच्या वतीने संघातील सर्व सदस्य, कोरोना योद्धे म्हणून कार्य केलेल्या वाहतूक विभागाचे पोलीस, चाकण ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी यांना, तसेच चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या हस्ते सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्क व आर्सेनिक आल्बम गोळ्या वाटप करण्यात आले.

गांधीगिरी करून मास्क वाटप :-
पुणे-नासिक महामार्गावरून विनामास्क प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना गांधीगिरी करून मास्क देण्यात आले. विशेष म्हणजे महामार्गावरून रत्नागिरीला जाणाऱ्या एका चारचाकी वाहनातील विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही गांधीगिरीचा अवलंब करीत मास्क देण्यात आले.

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, कार्याध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, जिल्हा समन्वयक सुनील जगताप, परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली व हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे खेड तालुका अध्यक्ष हनुमंत देवकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संचालक मंडळ व पत्रकार बांधवांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक एन. जी. ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशक संतोष नायकोडी यांनी एचआयव्ही एड्स या विषयावर मार्गदर्शन करून जनजागृती केली. यावेळी उपस्थितांना माहिती पुस्तिका वाटण्यात आल्या.

याप्रसंगी चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. एन. जी. ढवळे, हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष हनुमंत देवकर, माजी अध्यक्ष हरिदास कड, माजी अध्यक्ष कल्पेश भोई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अर्जुन मेदनकर, सल्लागार संजय बोथरा, शिवाजी आतकरी, सचिव गणेश आहेरकर, उपाध्यक्ष हमीद शेख, माजी उपाध्यक्ष विवेक बच्चे, सदस्य सुनील बटवाल, बापूसाहेब सोनवणे, सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

दरम्यान चाकण- तळेगाव येथील चौकात आरोग्य कर्मचारी, मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट, पत्रकार संघाचे अध्यक्ष हनुमंत देवकर, सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी एड्स जनजागृती करणारे फलक झळकावून प्रवासी व वाहनचालकांची जनजागृती केली.

किशोरवयीन मुलांना लैंगिक शिक्षण देणे काळाची गरज : वैद्यकीय अधिक्षक डॉ. एन. जी. ढवळे
चाकण ग्रामीण रुग्णालयात संपन्न झालेल्या एड्स जनजागृती चर्चासत्रात चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक एन. जी. ढवळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “एड्स हा आजार दूषित रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध या माध्यमातून होतो. किशोरवयीन मुलांना लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे, कारण अजाणतेपणी या वयात चुका होण्याची शक्यता असते. पालकांनी यासंबंधी मुलांशी खुलेपणाने बोलणे गरजेचे आहे किंवा आरोग्य विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या युवा जनजागृती शिबिरांत मुलांना पाठवण्याची गरज आहे.”

समुपदेशाने एड्स बाधित रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतात : समुपदेशक संतोष नायकोडी
“जरी चुकून एखादया व्यक्तीला एड्स हा आजार झाला तर तो आजारापेक्षा समाजाकडून किंवा कुटुंबाकडून काय वागणूक मिळेल याच्या दबावाखाली जास्त खचून जातो. समुपदेशन केल्यामुळे अनेक एड्स बाधित रुग्ण औषधोपचार व योग्य काळजी घेऊन सामान्य आयुष्य जगू शकत शकतात.” असे सांगून एच. आय. व्ही. आणि एड्स यातील फरक काय आहे हे त्यांनी सविस्तर सांगितले.

यावेळी पत्रकार व कवी विवेक बच्चे यांनी सादर केलेल्या एड्स आजार जनजागृतीपर ‘उजळू जीवन ज्योति’ या कवितेला उपस्थितांनी दाद दिली. कार्यक्रमाच्या शेवटी हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष हनुमंत देवकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

तसेच खेड तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन ( झूम द्वारे ) एचआयव्ही एड्स जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

9 hours ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

1 month ago

This website uses cookies.