दिन विशेष

एच.आय.व्ही. सहजीवन जगणाऱ्यांचे हक्क व अधिकारांसाठी एकत्र येणे गरजेचे : सनी लोपेझ

 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
मंचर : १० डिसेंबर जागतिक मानवधिकार दिनानिमित्त एच.आय.व्ही. सहजीवन जगणाऱ्यानी आजपर्यंत दिवंगत झालेल्या बालक व नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी श्री. सनी लोपेझं यांनी आपल्या मनोगतात “आपण सर्वजण एकत्र येऊन एच.आय.व्ही. सहजीवन जगणाऱ्यांचे हक्क व अधिकारांसाठी एकत्र येणे गरजेचे आहे. जेणेकरून या आजाराने कोणीही व्यक्ती न खचता नव्या उमेद्दीने जगण्यासाठी प्रेरणा देण्याकरिता आपण प्रयत्नशील असणे आवश्यक आहे”, असे प्रतिपादन केले.

मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लि. व यश फौंडेशनच्या वतीने एच.आय.व्ही. सहजीवन जगणाऱ्यांनी त्यांचे अधिकार व हक्कांना उजाळा मिळावा या उदेशाने मंचर येथे एकत्र येऊन आजपर्यंत दिवंगत झालेल्या बालक व नागरिकांना मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली अर्पण केली.

प्रत्येक मानवाला जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या मुलभूत हक्कांचा समावेश भारतीय संविधानात केला आहे. उदा. प्रत्येक व्यक्तीला कायद्यापुढे समानतेची वागणूक मिळावी, तसेच कायद्याचे संरक्षण, व्यक्तीचा धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या विविध कारणास्तव कोणीही त्या व्यक्तीशी भेदभाव करू नये, असे संविधानात नमूद केलेले आहे. याचप्रमाणे समाजातील सर्वसाधारण नागरिकांप्रमाणेच एच.आय.व्ही. सहजीवन जगणाऱ्यांना देखील सन्मानाने, प्रतिष्ठेने जगण्याचा व समानतेची वागणूक मिळण्याचा तेवढाच अधिकार आहे.

या प्रसंगी महिंद्रा कंपनीचे श्री.सनी लोपेझ, श्री. रणजित पाटील, यश फौंडेशनचे अध्यक्ष श्री रवींद्र पाटील, एच.आय.व्ही.सहजीवन जगणारे ५५ सदस्य व बालक उपस्थित होते.

तसेच यश फौंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी आपल्या मनोगतात वेळेवर ART (औषध गोळ्या) घेण्याचे आवाहन केले.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 28 Apr 2026

सोमवार, २७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भामास्केट…

1 day ago

MahaBulletin — 27 Apr 2026

रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…

2 days ago

MahaBulletin — 27 Apr 2026

शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…

2 days ago

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

5 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

1 week ago

This website uses cookies.