कृषी

महाबुलेटिन विशेष… ‘हे’ संशोधन ठरणार वरदान…

कांदा साठवणुकीसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित
कला बायोटेक-कांदा लसूण संशोधन केंद्राची यशस्वी मोहोर

महाबुलेटीन न्यूज । शिवाजी आतकरी
कला बायोटेक आणि भारत सरकारच्या कांदा लसूण संशोधन केंद्राने कांदा साठवणुकीवर ’कंट्रोल्ड ओनीयन स्टोरेज स्ट्रकचर’ हे अतिशय प्रभावी संशोधन विकसित केले आहे. विविध प्रयोग आणि त्यातील निरीक्षणे लक्षात घेता हे संशोधन कांदा उत्पादक ते ग्राहक या साखळीतील प्रत्येक घटकासाठी उपयुक्त ठरणार आहे. हे संशोधन पथदर्शी ठरणार आहे.

कांद्यावर संशोधन करणारे राजगुरुनगर येथील कांदा-लसूण केंद्र व चाकण येथील कला बायोटेक यांच्या संयुक्त प्रयत्नातून कमी खर्चात कांदा साठवणुकीचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. याबाबत आज चाकण येथे कार्यशाळा पार पडली.यावेळी कांदा लसूण संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ, नाबार्ड, विविध बँकांचे अधिकारी, महाराज्य ग्रुप ऑफ एफपीसी, महाएफपीसी प्रतिनिधी, कला बायोटेकचे तंत्रज्ञ उपस्थित होते. कांदा साठवणुकीतील या तंत्रज्ञानाचा ग्राहक व उत्पादक या दोघांनाही चांगला फायदा होणार असल्याचे कांदा लसूण संशोधन केंद्राचे संशोधक डॉ. राजीव काळे यांनी यावेळी सांगितले.

“संशोधनातुन समोर आले कांदा साठवणुकीचे नवीन तंत्रज्ञान”
—————————-
कांदा साठवणुकीचे प्रभावी आणि नुकसान नियंत्रित करणारे तंत्रज्ञान विकसित करण्याची कांदा लसूण केंद्रावर जबाबदारी आहे. काही वर्षापासून वातावरणातील मोठा बदल, अवकाळी पाऊस, गारपीट, कांदा पिकांवर होणारा अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर अशा कारणांमुळे पिकवलेला कांदा जास्त काळ टिकत नाही. त्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. अशा परिस्थितीत उत्पादन खर्च आणि बाजारमूल्य यांची योग्य सांगड बसू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन केंद्रावर साठवणीबाबत उपाययोजनांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानुसार दीर्घकाळ कांद्याची साठवणूक करण्यासाठी कमी खर्चात कांदा साठवणुकीचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. पारंपरिक पद्धतीने साठवून ठेवलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे चित्र सध्या सर्रास दिसून येते. हे नुकसान टाळण्यासाठी नवीन तंत्रज्ञानातून विकसित केलेली पद्धत शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार असल्याचे कांदा-लसूण संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. राजीव काळे यांनी सांगितले.

कांदा साठवणूक

कांद्याच्या साठवणुकीसाठी कमी खर्चात विकसित केलेले हे तंत्रज्ञान सरकारी पातळीवरून अनुदान देऊन शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्यास शेतकरी सहजतेने समस्येवर मात करू शकेल असा विश्वास कला बायोटेकचे संचालक मनोज फुटाणे यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली.

■ हे संशोधन कशासाठी उपयुक्त?
————————
● कांद्याची साठवण क्षमता वाढवते
● वजन अल्प प्रमाणात घटते
● कांदा सडण्याचे प्रमाण अत्यल्प
● मूल्य स्थिरीकरणासाठी अशी साठवण उपयुक्त
● ६० पैसे प्रति किलो, प्रति महिना खर्च
● उत्पादक ते ग्राहक या साखळीतील सर्वांसाठी फायदेशीर

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 day ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

2 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

5 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

5 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

6 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

6 days ago

This website uses cookies.