ग्रामपंचायतच्या प्रशासकपदी पोलीस पाटील यांना प्राधान्य द्या : प्रकाश भैय्या गायकवाड

महाबुलेटीन नेटवर्क / विनोद गोलांडे
बारामती : जिल्हात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत, यात पारदर्शक व्यवहारासाठी पोलीस पाटील यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना सातारा जिल्हा प्रमुख प्रकाश भैय्या गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे. कोरोणाचा पार्दुभाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ग्रामपंचायतच्या निवडणुका पुढे ढकल्या आहेत. आता ग्रामपंचायतवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे, यासाठी अनेकांनी मोर्चे बांधनी सुरू केली आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली तर ग्राम विकासात अङथळा येऊ शकतो. प्रशासक काळात काम करताना राजकीय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यास त्यास गावातून विरोध होऊ शकतो हा नको, तो नको यातून गावात तंटे – वाद होण्याची शक्यता आहे. शिवाय कोरोना जनजागृती समीतीत शासनाने नेमून दिलेले काम विशेष करून पोलीस पाटील यांनी पण महत्वाची भुमिका निभावली आहे. पोलीस पाटील यांनी कोरोना बाबत ग्रामस्थांशी व प्रशासनांशी चांगला समन्वय ठेवला आहे व कोरोनाचे संकट कायम असल्याने ग्रामपंचायतच्या प्रशासकपदी पोलीस पाटील यांची नियुक्ती झाल्यास पारदर्शकपणे कारभार होऊ शकतो. शिवाय ग्रामस्थांना न्याय देण्याचे काम होणार आहे, असे महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना सातारा जिल्हा प्रमुख प्रकाश भैय्या गायकवाड यांनी म्हटले आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 30 Apr 2026

बुधवार, २९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

17 hours ago

MahaBulletin — 30 Apr 2026

मंगळवार, २८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

17 hours ago

MahaBulletin — 28 Apr 2026

सोमवार, २७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भामास्केट…

3 days ago

MahaBulletin — 27 Apr 2026

रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…

4 days ago

MahaBulletin — 27 Apr 2026

शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…

4 days ago

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

6 days ago

This website uses cookies.