आरोग्य

ग्रामीण रुग्णालयाची इमारत कोविड केअर सेंटरसाठी ताब्यात घेण्याची मागणी

महाबुलेटिन न्यूज / शैलेश काटे
इंदापूर :
शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील बाबा चौका जवळची ग्रामीण रुग्णालयाची वापरात नसलेली इमारत डागडुजी करुन कोविड केअर सेंटरसाठी वापरात आणावी, अशी
मागणी होत आहे.

व्यंकटेश देवस्थानकडून इंदापूर नगरपरिषदेने भाडेतत्वावर घेतली होती. तेथे इंदापूर नगरपरिषद रुग्णालय चालवत होती. सन १९७५ नंतर, ही जागा व दवाखाना हस्तांतरित करण्यात आले. इंदापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालय आस्तित्वात येण्याआधी तेथे शासकीय रुग्णालयाचे कामकाज चालत होते. आत्ता ती जागा वापरात नाही. काही ठिकाणी पडझड झाली आहे. मोठ्या प्रमाणात झाडे झुडुपे वाढलेली आहेत. प्रातःर्विधीसाठी वापर होतो आहे.

हे ठिकाण इंदापूर पोलीस ठाणे, एसटी बसस्थानक, उपजिल्हा शासकीय रुग्णालय यापासून जवळच्या अंतरावर आहे. कोविड केअर सेंटर साठी ही जागा ताब्यात घेतल्यास इमारतीची डागडुजी व परिसराची स्वच्छता होईल. कोविडच्या साथीचे निर्मुलन झाल्यानंतर इतर शासकीय कामासाठी या इमारतीचा वापर होवू शकेल, असे लोकांचे मत आहे.
———
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 21 Jun 2026

शनिवार, २० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 🛣️ पुणे-नाशिक…

8 hours ago

MahaBulletin — 20 Jun 2026

शुक्रवार, १९ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुणे-नाशिक…

1 day ago

MahaBulletin — 19 Jun 2026

गुरुवार, १८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 18 Jun 2026

बुधवार, १७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ मोठे…

3 days ago

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

6 days ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

1 week ago

This website uses cookies.