ग्रामपंचायत प्रशासक पदासाठी अकरा हजार पक्षनिधी घेण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला मागे

महाबुलेटीन नेटवर्क / शैलेश काटे
इंदापूर : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक पदासाठी इच्छुक असणा-या उमेदवारांच्या नियुक्तीसाठी ११ हजार रुपये पक्षनिधी घेण्याचा आदेश पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी मागे घेतल्याचे वृत्त आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि.१ जुलै २०२० ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान पुणे जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींची मुदत संपलेली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये  प्रशासक म्हणून एका व्यक्तीच्या नेमणूक करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना प्राधिकृत केले आहे.
या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवाराकडून ११ हजार रुपये एवढी विनापरतीची रक्कम पक्षनिधी म्हणून घ्यावी. ती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत खात्यामध्ये जमा करावी. त्याच्या पावतीची झेरॉक्स प्रत उमेदवारी अर्जासोबत जोडून ते अर्ज दि.२० जुलैपर्यंत आपणाकडे आणून द्यावेत, असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पुणेे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांना दिले होते.
तथापि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची कुचंबणा करणारा हा आदेश असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून होवू लागली. आदेश काढल्याचे उघड झाल्यानंतर सरकारच्या जागांच्या नावावर राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःची तिजोरी भरण्यास सुरुवात केल्याची टीका विरोधी पक्षांकडून होवू लागलेली आहे.
दरम्यान या प्रकरणासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. पक्षाकडे प्रशासक पदासाठी इच्छुक असणारे खुप जण आहेत. योग्य व्यक्तीला ते पद मिळावे ही पक्षाची भूमिका आहे. आगामी काळात पक्षाकडे स्वनिधी असावा त्यासाठी पक्षनिधी वाढवण्यासाठी ही योजना आखलेली होती. ही पक्षांतर्गत बाब आहे. पक्षनिधी वाढण्यासाठी केलेली योजना गैर नाही, असे सांगून पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा आदेश मागे घेण्यात आला आहे, असे गारटकर यांनी स्पष्ट केले आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.