गुड न्यूज : दुबईतून १३६ महाराष्ट्रीयांची दुसरी तुकडी परतली

मसालाकिंग डॉ. धनंजय दातार आले धावून
महाबुलेटिन नेटवर्क
मुंबई : मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी दुबईत अडकलेल्या भारतीयांना मायदेशी पाठविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी १८६ रोजगारवंचित व निर्धन महाराष्ट्रीय कामगारांना स्वखर्चाने चार्टर्ड फ्लाईटने भारतात पाठवले होते. याच मोहिमेअंतर्गत आता दुसऱ्या फेरीत महिला व लहान मुलांचा समावेश असलेल्या अनेक मराठी कुटूंबांना संधी मिळाली आहे. एकूण १३६ महाराष्ट्रीयांचा दुसरी  तुकडी  काल विमानाने परतली.
   आहे. ही कुटूंबे महाराष्ट्रभरातील विविध शहरे व गावांतील आहेत.
     दुबईस्थित अल अदील ट्रेडिंग कंपनीचे  व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार हे कोविडच्या कठीण परिस्थितीत निर्धन देशबांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. याआधी लॉकडाऊनच्या काळात त्यांनी अडचणीत सापडलेल्या हजारो भारतीयांना रोजच्या गरजेच्या वस्तू, खाद्यपदार्थ व औषधांचे संच मोफत पुरवले होते. युएई आणि भारतादरम्यानची विमान वाहतूक सुरळीत झाल्यावर त्यांनी कंपनी सामाजिक दायीत्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत जवळपास ३५०० गरजू भारतीयांचा खाण्या-पिण्याचा, वैद्यकीय चाचणीचा व विमान तिकीटाचा खर्च उचलून त्यांना सुखरुप भारतात रवाना केले. त्यामध्ये केरळ, तमीळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, आसाम, नागालँड, मिझोराम आदी राज्यांमधील रहिवाशांचा समावेश आहे. या मोहिमेसाठी डॉ. दातार यांनी आतापर्य़ंत ३ कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे.
     ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून दुबईत अडकून पडलेल्या ज्या गरजू व निर्धन भारतीयांना भारतात परतण्यासाठी मदत हवी असेल त्यांनी स्वतः अथवा नातलगांमार्फत संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. दातार यांनी केले आहे.
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.