शैक्षणिक

गोवा येथील राज्यस्तरीय हिंदी संमेलनामध्ये नवमहाराष्ट्र विद्यालयातील दोन हिंदी विषय शिक्षकांना “भाषारत्न” पुरस्कार…

गोवा येथील राज्यस्तरीय हिंदी संमेलनामध्ये नवमहाराष्ट्र विद्यालयातील दोन हिंदी विषय शिक्षकांना “भाषारत्न” पुरस्कार…

महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर
गोवा हिंदी अकादमी, गोवा पुरस्कृत राज्यस्तरीय हिंदी प्रचार, प्रसार संमेलनात पुणे जिल्ह्यातील 15 हिंदी विषय शिक्षकांना “भाषारत्न” पुरस्काराने सन्मानित केले गेले असल्याची माहिती संमेलनाचे राज्य सहसमन्वयक श्री. उस्मान मुलाणी यांनी दिली. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील खराबवाडी ( चाकण ), ता. खेड येथील नवमहाराष्ट्र विद्यालय या प्रशालेतील हिंदी विषय शिक्षक श्री. अशोक ठाणगे व श्री. अशोक शिंदे या दोन शिक्षकांना “भाषारत्न” पुरस्काराने गौरविण्यात आले. 

गोवा येथे गोवा हिंदी अकादमी पुरस्कृत राज्यस्तरीय हिंदी प्रचार व प्रसार संमेलनाचे आयोजन दि.१९,२० व २१ फेब्रुवारी २०२१ रोजी पणजी मिरामार येथील हाॅटेल सोलमार मधील सभागृहात करण्यात आले होते.

जेष्ठ संपादक प्रभाकर ढगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या संमेलनाचे उदघाटन गोव्याचे कला, सांस्कृतिक आणि सहकार व आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या शानदार सोहळ्यासाठी देशाचे पूर्व केंद्रीय कायदा मंत्री व गोव्याचे उपमुख्यमंत्री वकील रमाकांत खलफ, गोव्याचे पूर्व मुख्यमंत्री रवी नाईक, गोव्याचे पूर्व क्रिडा व कृषिमंत्री रमेश तवडकर, गोव्याचे शिक्षण संचालक भगिरथ शेट्ये हे उपस्थित होते. तर गोवा हिंदी अकादमी गोवाचे अध्यक्ष सुनील शेट हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते.

या संमेलनामध्ये चर्चासत्र, कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि “भाषारत्न” पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी काही महत्वपूर्ण ठरावही मांडले गेले. महाराष्ट्रातील निवडक शंभर हिंदी विषय शिक्षकांची निवड या संमेलनासाठी करण्यात आली असल्याची माहिती राज्य संमेलनाचे मुख्य संयोजक कैलास जाधव यांनी दिल्याचे सुभाष खरबस यांनी सांगितले. संमेलनाचे मुख्य संयोजक कैलास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या संमेलनाचे नियोजन केले होते.

श्री. अशोक ठाणगे व श्री. अशोक शिंदे यांना “भाषारत्न” पुरस्कार…
या सम्मेलनात नवमहाराष्ट्र विद्यालय खराबवाडी या एकाच प्रशालेतील अशोक ठाणगे व अशोक शिंदे या दोन हिंदी विषय शिक्षकांना राज्यस्तरीय “भाषारत्न” पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.

खराबवाडी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष शिवाजी कड, सचिव गोरक्षनाथ कड, प्रशालेचे अध्यक्ष प्रकाशशेठ खराबी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदाराम कड, प्रशालेचे मुख्याध्यापक अविनाश कड, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रघुनाथ खराबी व सर्व संचालक मंडळ आणि शिक्षक वृंद यांनी दोन्ही शिक्षकांचे अभिनंदन केले.
——

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.