महाबुलेटीन न्यूज / अविनाश घोलप
घोडेगाव : देशभरात नव्हे तर संपूर्ण जगभरात कोरोनाने कहर केला असताना भारताचा ७४ वा स्वातंत्र दिन साध्या पध्दतीने सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत साजरा करण्यात आला. आंबेगाव तालुका तहसील कार्यालय येथे महाराष्ट्र राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
तसेच संपूर्ण घोडेगाव परिसरात साध्या पद्धतीने कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत झेंडावंदन करण्यात आले. सर्व प्रथम घोडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महाराणी लक्ष्मीबाई चौक, जनता विद्यालय, पंचायत समिती कार्यालय, घोडेगाव ग्रामपंचायत कार्यालय, बी. डी. काळे महाविद्यालय तसेच तहसीलदार कार्यालय घोडेगाव येथे कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत ध्वजारोहन समारंभ पार पडला.
याप्रसंगी स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा देताना वळसे पाटील म्हणाले की, जनजीवन सुरळीत होत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने समाजात वावरताना स्वतःसाठी, कुटुंबासाठी व समाजासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे. याप्रसंगी सर्व शासकीय, निमशासकीय पदाधिकारी, राजकीय नेते, कार्यकर्ते, पत्रकार उपस्थित होते.
——–
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.