महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
आळंदी : चिंबळी (ता. खेड) येथील एटीएम मशिन गॅस कटरने कापून चोरट्यांनी लाखो रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना रविवारी (दि. १३) पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सोमवारी रात्री उशीरा आळंदी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
चिंबळी गावात हिताची मनी स्पॉट एटीएम सेंटर आहे. रविवारी पहाटे अज्ञात चोरटे या एटीएम सेंटरमध्ये आले. मशिनच्या कॅमेऱ्यावर रंगाचा स्प्रे मारला. त्यानंतर एटीएमचा खालचा भाग गॅस कटरच्या साहाय्याने कापला. मशिनमधून रोकड घेऊन ते पसार झाले. या एटीएम मध्ये अंदाजे ९ लाखाची रोकड असल्याचे सांगण्यात आले आहे. हा सर्व प्रकार १० मिनिटांत झाला आहे. या एटीएम सेंटरबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. त्यामुळे चोरट्यांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना अडचण येत आहे. एटीएम सेंटरच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे हे सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे असतानाही संबंधितांकडून हलगर्जीपणा केल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी आळंदी पोलिस तपास करीत आहेत.
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.