सावली फाऊंडेशन व अभिजीत आर्ट्स च्या माध्यमातुन कोरोना च्या महामारी मध्ये एक अभिनव उपक्रम..

महाबुलेटीन नेटवर्क
हडपसर ( दि. २३ ) : दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. त्यातच दोन महिन्यावर आलेल्या गणेशोत्सवाचे काय ? असा प्रश्न अनेक गणेशभक्तांना पडला आहे.
त्यावर रामबाण उपाय म्हणुन अभिजीत आर्ट्स व सावली फाऊंडेशन यांनी एक अप्रतिम संकल्पना पुढे आणली आहे.

बाप्पा आपल्या घरी या संकल्पनेतुन श्री गणेश मुर्ती एका टॅपो ट्रॅव्हलर मधुन आपल्या सोसायटी, काॅलनी पर्यंत आणणार असुन त्या मधील मुर्ती पाहुन गणेश भक्तांनी मुर्ती बुकिंग करुन ठेवायची असुन त्या नंतर अभिजीत आर्ट्स गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी तीच मुर्ती म्हनजेच बाप्पा आपल्या घरी
पोहोच करणार आहेत.

कोरोना च्या या जीवघेण्या महामारी मध्ये नागरिकांनी गर्दीची ठिकाणी जाणे टाळले पाहिजे, तसेच सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे झाले असल्यामुळे त्यावर उपाय म्हणून हि संकल्पना लोकहिताचा विचार करुन आणली आहे. समस्त गणेश भक्ताना नक्कीच हि संकल्पना आवडणार असुन ते नक्कीच या संधीचा फायदा घेतील असा विश्वास अभिजीत आर्ट्सचे मालक सुरेश आबनावे व नगरसेवक योगेश ससाणे यांनी व्यक्त केली आहे.

सुरेश आबनावे हे हडपसर परिसरातील ३५ वर्षा पासुन या व्यवसायात असणारे एक अग्रगण्य व्यापारी आहेत, अभिजीत आर्ट्स ची खासियत म्हनजे डायमंड वर्क व ड्रेपरी नेसविलेले गणेश मुर्ती ! यामध्ये त्यांचा हातखंडा असुन अभिमानाची गोष्ट
म्हणजे महाराष्ट्रात प्रथमच २००९ साली ही संकल्पना सुरेश आबनावे यांनी प्रत्यक्षात अंमलात आणली होती.

दरवर्षी अभिजीत आर्टच्या गणेश मुर्ती पुणे शहर, सोलापुर, कोल्हापुर, ठाणे, वाशी, मुंबई इत्यादी जिल्ह्यामध्ये
तसेच अगदी परदेशात दुबई, थायलंड, माॅरिशियस व अमेरिका मध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात गणेश भक्त मोठ्या भक्तिभावाने घेऊन जात असतात.

मुर्ती पाहण्यासाठी आपण नक्कीच गणपती बाप्पा ची गाडी मागावुन घेतल्यास आपल्या ला घरबसल्या गणेश मुर्ती पाहता व बुक करता येणार आहे.
सावली फाऊंडेशन गेली ७ वर्षे मुर्ती दान संकल्पना राबवत असते. दरवर्षी हजारो मुर्ती दान घेऊन त्या पर्यावरण पुर्वक विधिवत विसर्जन करण्याचे काम नगरसेवक योगेश ससाणे करीत असतात. या वर्षी कोरोनाच्या महामारी मुळे बाप्पा आपल्या घरी हि अभिनव संकल्पना अभिजीत आर्ट्सच्या माध्यमातुन साकारताना विशेष आनंद होत आहे, अशी भावना योगेश ससाणे व सुरेश आबनावे यांनी व्यक्त केली.

admin

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.