‘बापाचा दिवस’
राबतो, खपतो
बाप नावाचा माणूसप्रेमही त्याचं रांगडंजसा कोसळणारा पाऊस ।पाण्यातला मासाच तोआसवं त्याची दिसेनास्वप्नांचा चक्काचूर त्याच्या‘तो’ लेकरांना कळेना ।।अशा भावना मनात येऊन गेल्या. अर्थात त्यास निमित्त होतं फादर्स डे या अलीकडे दाखविण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या दिवसाचे! ‘बापाचा दिवस’ फादर्स डे च्या दिवशी घातला जातो, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. संवादाच्या अभावास दोन पिढ्यांमधील विचारांचे अंतर, असे गोंडस नाव दिले जाते. या नावाखाली बाप दूर ठेवला जातो. बापास काय कळतंय, असे लेबल लावलं जाते. यातून बाप अंधारात ठेवला जातो. अंधारातील बापाला दूर ठेऊन स्वतःचीच फसवणूक करून घेणारे काही कमी नाहीत. बाप हा बाप असतो, हे ‘त्या’ बेटयाना समजून सांगण्याची गरज वाटून जाते. कारण बाप-बेट्या मधील संवाद कमी होतोय. त्यामुळे दरी वाढतेय. सोशल माध्यमांमधून ठराविक दिवशी व्यक्त होण्याचा प्रकार म्हणजे ‘मूक संवाद’आहे. हा संवाद वांझोटा आहे. प्रेमाच्या प्रदर्शनाची नव्हे तर प्रेमाच्या कृतीचा बाप भुकेला आहे. पोरांनो बापाला समजून घ्या रे ! डीपी लावून, स्टेटस ठेऊन, फेसबुकला व्यक्त होऊन ‘बापाचा दिवस’ फादर्स डे च्या नावाखाली घालू नका…ती आपली संस्कृती नाही….बाप समजून घेताना पोरांनो तुम्हीही व्हा थोडे मोकळे! कोणाचाही असो, कसाही असो, फाटका असो- तुटका असो….बाप हा बाप असतो.——शिवाजी आतकरीमहा बुलेटिन न्यूज
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
This website uses cookies.