ग्रंथालय

एक राखी जवानांसाठी …. ● क्रांती महिला बचत गट व संतभारती ग्रंथालयाचा उपक्रम… ● पोलीस व जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा…

एक राखी जवानांसाठी ….
● क्रांती महिला बचत गट व संतभारती ग्रंथालयाचा उपक्रम…
● पोलीस व जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा…

महाबुलेटीन न्यूज
चाकण / तळेगाव दाभाडे : पुणे जिल्ह्यातील खराबवाडी ( ता.खेड ) येथील क्रांती महिला बचत गट व नाणेकरवाडी येथील संतभारती ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक राखी जवानांसाठी’ या उपक्रमांतर्गत महिला लैंगिक शोषण तक्रार केंद्रीय समितीच्या एनडीआरएफ बटालियन ५ मधील सदस्या मंगलताई हनुमंत देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीआरएफचे १००० जवान व महाळुंगे इंगळे येथील ५० पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.

एन डी आर एफ जवानांचा सत्कार करताना महिला…

तसेच कोकणातील तळीये येथे एनडीआरएफच्या जवानांनी जीव धोक्यात घालून रात्रंदिवस मृतदेह बाहेर काढण्याचे काम करून कोकणातील पूरग्रस्तांना वाचविण्याचे काम केल्याबद्दल महिलांच्या वतीने एनडीआरएफचे अधिकारी व जवानांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. निरीक्षक पराग पितांबर व सुहास थोरात यांनी हा सत्कार स्वीकारला. हा कार्यक्रम बटालियन ५ चे कमांडंट अनुपम श्रीवास्तव, डेप्युटी कमांडंट पवन गौड यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. तर पोलीस ठाण्यातील कार्यक्रम वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. 

रक्षाबंधन या सणाला बहीण आपल्या भावाला राखी बांधून औक्षण करत असते. भावाने आपले सदैव रक्षण करण्यासाठी व बहीण-भावांमधील प्रेम जिव्हाळा कायम चिरकाल टिकून ठेवण्यासाठी राखी बांधली जाते. परंतु अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी जवानांना व पोलिसांना आपले कर्तव्य बजावताना घरी जाता येत नाही. व कुठला सणही साजरा करता येत नाही. यावर्षी कोकणात पूर आल्याने एनडीआरएफच्या जवानांनी आपला जीव धोक्यात घालून अनेक नागरिकांचे प्राण वाचविले. भारतमातेचे रक्षण करण्याची यशस्वी जबाबदारी या जवानांनी आपल्या खांद्यावर घेतलेली असते. देशाचे जवान आणि पोलीस यांच्यामुळे आपण आपल्या घरात सुखाची झोप घेत असतो. या जवानांचे आपण सदैव ऋणी आहोतच.

म्हाळुंगे पोलीस चौकीत पोलीस स्टाफ व अधिकाऱ्यांना महिलांनी राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले…

देशातील जनता, जवान आणि पोलीस यांचे बंधुत्वाचे नाते आहे. हेच नाते वृद्धिंगत करण्यासाठी आणि जवान व पोलीस यांचे मनोबल, मनोधैर्य वाढविण्यासाठी क्रांती महिला बचत गट, तिरुपती महिला बचत गट, अष्टविनायक स्वयंसहाय्य महिला बचत गट व संतभारती ग्रंथालय यांनी ‘एक राखी जवानांसाठी’ हा अनोखा उपक्रम राबविला. पूर, भूकंप, आग, इमारत कोसळणे, दरीमध्ये पडणे आदी नैसर्गिक आपत्तीच्यावेळी एनडीआरएफचे जवान कसे काम करतात, त्यांच्या या कार्याचा आढावा व्हिडीओ द्वारे उपस्थित महिलांना दाखविण्यात आला. यावेळी ‘गाढवाचं लग्न’ फेम मराठी चित्रपट अभिनेत्री जयमाला इनामदार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करून मनोगत व्यक्त केले. असिस्टंट कमांडंट निखिल मुदलकर यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी संतभारती ग्रंथालय व क्रांती महिला बचत गटाच्या सचिव मंगलताई देवकर, अध्यक्षा संगीता केसवड, भारती कड, अनिता कड, कृषी अधिकारी सोनाली देवकर, रेखा गाळव, योगिता पडवळ, कामिनी लवंगे, माजी ग्रा.पं. सदस्या सिंधू गजशिव व सुनंदा शिंदे, खेड तालुका ग्रंथालय संघाचे व हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष हनुमंत देवकर, अजिंक्य देवकर आदी मान्यवर उपस्थित होते. 


——————

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

1 day ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

1 day ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

2 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

This website uses cookies.