महाबुलेटीन न्यूज
महाळुंगे इंगळे : पुणे-नासिक महामार्गावर कुरुळी गावच्या हद्दीत स्पायसर कंपनीजवळ दुचाकीला टेम्पो धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात २८ मार्च रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला. उमेश देवानंदसिंग जाधव ( वय २५, रा. भोसरी, पुणे, मुळगाव तारखेड, ता. नांदुरा, जि. बुलढाणा ) असे अपघात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जाधव हा आपली पॅशन प्रो दुचाकी ( नं. एम एच १९ बी एल ४७१६ ) वरून जात असताना वाहन चालकाने डावीकडून धडक देऊन अपघात केला.
याबाबत संदीप दामू चौधरी ( वय ४२, रा. ग्लोरियस पार्क, इंद्रायणी नगर, ) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी टाटा गाडी ( नं. एम एच ०४ जी एफ ४९६० ) चा वाहनचालक गणेश किसन चोपाडे ( वय २९, रा. चिंबळी, ता. खेड ) याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अशोक जायभाये पुढील तपास करीत आहेत.
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…
मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…
This website uses cookies.