महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : येथील स्व. गुलाबराव गोरे प्रतिष्ठाण संचालित
ज्ञानवर्धिनी विद्यालय व भामा इंग्लिश मिडियम स्कूल
येथे कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावमुळे सोशल डिस्टन्स पाळून मा. आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे अध्यक्ष विकास गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी पालक प्रतिनिधी विश्वास निकत, अजित टोपे, ज्ञानवर्धिनी विद्यालय मुख्याधिपिका प्रमिला गोरे, भामा स्कूल मुख्याधिपिका माधुरी गोरे, पर्यवेक्षक विवेक शिंदे, शिक्षक प्रतिनिधी दत्तात्रय लिंभोरे, बेळगे सर, चौधरी मॅडम, कणसे मॅडम, अनाप मॅडम, पठारे मॅडम, शिक्षेकेत्तर कर्मचारी बेनके, क्षीरसागर उपस्थित होते.
कोरोना संसर्गामुळे विद्यार्थी व पालक यांनी घरी राहूनच झेंड्याला सलामी दिली व देशाबद्दल अभिमान बाळगला.
संस्थेचे अध्यक्ष विकास गोरे यांनी सर्वांनी शासनाचे नियमांचे पालन करावे, स्वतः ची व समाजाची सुरक्षितता बाळगावी, तसेच विद्यार्थी यांनी घरीच राहून ऑनलाईन अभ्यास करून शिक्षण सुरु ठेवा व पालकांनी आपल्या मुलांची व स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या असा संदेश दिला. दत्तात्रय लिंभोरे यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले.
——
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.