अध्यात्मिक

ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात श्रावण मासारंभ, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात श्रावण मासारंभ,

धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

महाबुलेटीन न्यूज

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : वडमुखवाडी येथील श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात श्रावण मासानिमित्त श्री हरिविजयकथासार ग्रंथाचे पूजन थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विष्णू तापकीर यांचे हस्ते करण्यात आले.

मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रावण महिन्यानिमित्त श्री हरिविजय कथासार ग्रंथाचे वाचन केले जात आहे. या वाचनाचे नेतृत्व... साहेबराव शेळके महाराज करीत आहेत. विविध धार्मिक कार्यक्रमात पहाटे काकडा, आरती , दुपारी भजन, नित्य नेमाने हरिपाठ, हरिविजय ग्रंथाचे वाचन संध्याकाळी श्रींची माऊलींची आणि श्री पांडुरंगरायांची आरती नंतर भाविकांना श्रींचे दर्शन व्यवस्था करण्यातआली आहे. प्रथापरंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रम महिनाभर होणार आहेत. ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरातआयोजित कार्यक्रमात ... साहेबराव शेळके महाराज यांचा सत्कार शाल, श्रीफळ, उपरणे देऊन ट्रस्टचे अध्यक्ष विष्णू तापकीर यांचेहस्ते करण्यात आला. यावेळी ... रमेश महाराज घोंगडे यांचेसह भाविक, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

2 days ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

3 days ago

MahaBulletin — 13 Jun 2026

शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…

4 days ago

MahaBulletin — 12 Jun 2026

गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…

5 days ago

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

6 days ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

1 week ago

This website uses cookies.