निवड/नियुक्ती

धनगर साम्राज्य सेनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी बापुराव लकडे यांची निवड…

 

महाबुलेटीन न्यूज
बारामती ( प्रतिनिधी ) : खंडोबाचीवाडी ( ता बारामती) येथील सामाजिक कार्यकर्ते बापूराव लकडे यांनी जिल्हात केलेल्या समाज कार्याची दखल घेत तसेच वेळोवेळी झालेल्या धनगर आरक्षण चळवळीत सक्रिय सहभाग व समाजाविषयी असणारी एकनिष्ठता यामुळे लकडे यांची धनगर साम्राज्य सेनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

ही निवड धनगर साम्राज्य सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे-पडेगावकर तसेच पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख महादेव बुट्टे व पुणे जिल्हाध्यक्ष अमोल बो-हाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

निवडी नंतर बोलताना लकडे म्हणाले की, पुढील काळात सदैव समाजासाठी एकनिष्ठ रहाणार असुन समाजाच्या अडचणीसाठी रस्त्यावर उतरून काम करण्याची ही तयारी त्यांनी दर्शवली. तसेच धनगर आरक्षण चळवळीत यापुढेही असाच सक्रिय सहभाग राहिल, असे त्यांनी आश्वासन दिले.

या निवडीसाठी सोशल मिडीयाद्वारे परभणी लोकसभेचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, अमोल बो-हाडे, महादेव बुट्टे, सरपंच अंकुश लकडे, सचिन कोरडे, अमोल धायगुडे, बापुराव महानवर, तुषार गडदरे, बाळासाहेब महानवर, रोहन लकडे या मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.