महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : देहू तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पुलाच्या जोडरस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया तत्काळ करण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली.
देहू तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी येलवाडीच्या बाजूने भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्याने मोठा खर्च करून बांधलेला देहू – सांगुर्डी दरम्यानच्या पुलाचे काम पूर्ण होऊन बराच कालावधी लोटला. मात्र भूसंपादनाची नुकसान भरपाईची रक्कम मान्य नसल्याने रस्त्याच्या ३० मीटर रुंदीकरणाचे काम होत नसल्याने स्थानिक ग्रामस्थ श्री. वसंत भसे यांनी गांधी जयंतीच्या दिवशी उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. याबाबत खासदार डॉ. कोल्हे यांना माहिती मिळताच त्यांनी आज तातडीने जिल्हाधिकारी श्री. राजेश देशमुख यांची भेट घेऊन त्यांना खेड उपविभागीय अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या भूसंपादनाचा प्रस्तावावर तत्काळ निर्णय घेण्याची मागणी केली.
जिल्हाधिकारी श्री. देशमुख यांनी या संदर्भात जातीने लक्ष घालून लवकर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन डॉ. कोल्हे यांना दिले. याविषयी डॉ. कोल्हे म्हणाले की, भूसंपादनाच्या प्रस्तावावर निर्णय करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्ण व्हावा यासाठी आपण संबंधित सर्व यंत्रणांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.