ट्रान्सपोर्ट व्यावसायिक दत्तात्रय जबाजी कड यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी व वाहतूक व्यावसायिक दत्तात्रय जबाजी कड ( वय ७५ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, तीन भाऊ, दोन बहिणी, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
भैरवनाथ सोसायटीचे संचालक मच्छिन्द्र कड, खराबवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक हनुमंत कड, सोसायटी संचालक दिनकर कड यांचे ते बंधू, उद्योजक संतोष कड व बाळासाहेब कड यांचे ते वडील होत.
तसेच खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हनुमंत अनंतराव कड यांचे ते मावसबंधू, पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजीराजे खराबी व माजी उपसरपंच प्रकाश खराबी यांचे ते आतेभाऊ, तर अनंतकृपा पतसंस्थेचे संचालक सोपानराव खराबी यांचे ते व्याही होत.
त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी 0४:00 वाजता श्री चक्रेश्वर मंदिर चाकण येथे होईल. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना… भावपूर्ण श्रद्धांजली..* 💐💐🙏🏻🙏🏻
रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…
शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…
बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…
सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…
शनिवार, ११ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 मोशी…
गुरुवार, ९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अतिवृष्टीमुळे…
This website uses cookies.