गुन्हेगारी

दरोड्याच्या तयारीतील दोन जणांना अटक

विघ्नहर्त्याची दानपेटी पळविणारे जेरबंद, कोयता, कटावणी सह ४० हजाराचा मुद्देमाल जप्त

महाबुलेटीन न्यूज / किरण वाजगे
नारायणगाव : दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या दोन इसमांना आळेफाटा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना झापवाडी (ता. जुन्नर) येथे घडली.

आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत रविवार (दि.२३) पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास झापवाडी गावच्या हद्दीतील एका वस्तीवरील घरावर ५ दरोडेखोर दरोडा घालण्याचा’ प्रयत्न करत होते. यावेळी घरातली रहिवाशांना जाग आल्याने त्यांनी उठून आरडा ओरडा केला. आरडाओरडा केल्याने दरोडेखोरांनी घरावर दगडफेक करून व दहशद निर्माण करुन मंगरुळ गावच्या वनविभागाच्या हद्दीत दोघे पळून गेल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी पाहिले.

सदर घटनेची माहिती पोलिसांना नागरिकांनी दिली. पोलिसांनी तात्काळ गावातील चार ही रस्त्यावर नाका-बंदी करून त्यापैकी एका दुचाकीचा पाठलाग करून दोन दरोडेखोर पकडले. त्यापैकी एक इसम वन विभागाच्या जंगलात पळून गेला. पोलिसांनी पकडलेल्या दोघांकडे कोयता, कटावणी मोसा व इतर दरोड्याचे साहित्य असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सदर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या सोबतचे पळून गेलेल्या इतर ३ इसमांची नावे निष्पन्न झाली आहेत. या बाबत आळेफाटा पोलीस ठाण्यामध्ये आयपीसी ३९९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली.

या गुन्ह्यातील आरोपी विठ्ठल पथवे (वय ४५, रा. अकोले तालुका, जि. नगर व सोन्या पथवे (वय २८, रा. अकोले तालुका, जि. नगर) यांना अटक करण्यात आली असून सागर पथवे, पिंट्या व सावंत असे तिघेजण अन्य आरोपी फरार आहेत. त्यांच्याकडून मोटारसायकल, गुप्ती. बॅटरी, कोयता आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी श्रीक्षेत्र ओझर येथे झालेल्या दानपेटी चोरीच्या गुन्ह्यामध्ये या आरोपींना वर्ग केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुजावर यांनी दिली.

ही कामगिरी उपविभागीय पोलिस अधिकारी दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पोलीस हवालदार भोईर, पोलीस नाईक संदीप फड, पोलीस कॉन्स्टेबल गोरक्ष हासे, पोलीस कॉन्स्टेबल मोमीन, चालक समाधान अहिवळे, होमगार्ड शिरतर यांच्या पथकाने केली.
——-

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

8 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

8 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

9 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

9 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

10 months ago

This website uses cookies.