कोविड १९ उपचार केंद्रावरील प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती रद्द करा : केशव जाधव

महाबुलेटीन नेटवर्क : विनोद गोलांडे
बारामती : पुणे जिल्हा परिषदेचे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची १५ जुलै रोजी कोविड १९ उपचार केंद्र व विलगीकरण केंद्रावर नियुक्ती केल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवेतून सूट असलेल्या अनेक अपंग शिक्षकांचा तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या प्राथमिक शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या कामाचा शिक्षाकांना कसलाही अनुभव नाही. त्यामुळे सदरचे आदेश रद्द करावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस केशव जाधव यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
कोविड १९ उपचार केंद्रावर व विलगीकरंण केंद्रावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेस सहकार्य व्हावे, याकरिता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून ५० वर्षे वयाच्या आतील ५० प्राथमिक शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षकांना यासंदर्भात कसलेही प्रशिक्षण मिळालेले नसून या कामाचा कसलाही अनुभव नाही. तसेच सद्यस्थितीत शालेय कामकाज सुरु असून विद्यार्थ्यांचे गुगल क्लासरूम तयार करणे, त्यांना ऑनलाईन अभ्यास देणे, त्याची पडताळणी करणे आदी कामे शिक्षक करीत आहेत. तसेच यापूर्वी शिक्षकांनी कोरोना सर्वेक्षण, रेशनिंगवरील धान्य वाटपाचे सनियंत्रण, चेकपोस्ट सांभाळणे इत्यादी कामे केली आहेत. त्यामुळे कोविड १९ उपचार केंद्र व विलगीकरण केंद्रावरील नियुक्ती आदेश रद्द करण्याबाबतची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे करण्यात आली आहे. सदर निवेदनाची प्रत पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतारे तसेच आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांना पाठविण्यात आली असल्याचे  जाधव यांनी सांगितले.
admin

Recent Posts

MahaBulletin — 21 Sep 2026

रविवार, २० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ जिल्हा…

3 hours ago

MahaBulletin — 20 Sep 2026

शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ खेड…

1 day ago

MahaBulletin — 19 Sep 2026

बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

5 days ago

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

1 week ago

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

1 week ago

This website uses cookies.