सण-उत्सव

कोरोनामुळे सर्जा राजाचा घरीच सन्मान…

कोरोनामुळे सर्जा राजाचा घरीच सन्मान…

महाबुलेटीन न्यूज / ओमप्रकाश तांबोळकर
लातुर : कोरोनामुळे बळीराजाचा महत्त्वाचा असलेला पोळा हा सण घरीच साजरा करावा लागला असल्याने शेतकर्‍यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले. भारतीय संस्कृतीत पोळा हा शेतकर्‍यांकरिता महत्त्वाच्या सणांपैकी एक मानला जातो. या सणाच्या निमित्ताने बळीराजा वर्षभर आपल्या सोबत उन्हातान्हात थंडी पावसात राबराबणार्‍या सर्जा राजा प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. मात्र, कोरोना महामारी मुळे शेतकर्‍यांना आपल्या सर्जा राज्याच्या सार्वजनिक ठिकाणी न नेता घरीच पुरणपोळीचा नवैद्य खाऊ घालावा लागल्याने शेतकर्‍यांची कुंटुंबीयाची पोळा सणा बद्दल असलेल्या उस्तूकतेची हिरमोड झाली आहे.

शेतकरी कितीही आर्थिक अडचणीत असो वा संकटात मात्र तो हा सण फक्त आणि फक्त आपल्या सर्जाराजा या मित्राची कृतज्ञता बाळगत उत्साहात साजरा करण्याची ही परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे. हा सण शेतकर्‍यांना घरीच साजरा करावा लागला असला तरी देखील कोरोनामुळे पोळा सण सार्वजनिक ठिकाणी भरविता आला नाही. तरीही कोरोनासारखे कितीही मोठे संकट आले तरी शेतकर्‍यानी आपल्या ढवळ्या पवळ्याला घरीच सजवून त्यांच्या सन्मानात कुठेही कमतरता भासू दिली नाही, हे मात्र तितकेच खरे आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.