महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाचे पालन करून यावर्षी भीमा कोरेगावला न जाता समाज बांधवांनी गावमध्येच शौर्यदिन अत्यंत साधेपणाने साजरा केला. यावेळी १ जानेवारी १८१८ मधील वीर योद्ध्यांना सलामी देऊन अभिवादन करण्यात आले.
गावचे पोलीस पाटील किरण किर्ते, पुजाताई किर्ते, जेष्ठ पत्रकार हनुमंत देवकर व क्रांती महिला बचत गटाच्या सचिव मंगलताई देवकर या दाम्पत्यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे व भारतीय संविधानाचे पूजन करण्यात आले. तसेच संतभारती ग्रंथालयाच्या वतीने संविधान ग्रंथ भेट देण्यात आला. या क्रयक्रमाचे आयोजन भीमक्रांती सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील किरण किर्ते, जेष्ठ पत्रकार हनुमंत देवकर व सामाजिक कार्यकर्ते अभिषेक गोरडे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी हनुमंत देवकर म्हणाले, “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगावला न जाता समाज बांधवांनी गावातच शौर्यदिन साजरा केला, ही बाब स्तुत्य असून शौर्यदिन, भगवान बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करून त्यांना चौकटीत न ठेवता ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ हे बाबासाहेबांचे विचार तळागाळात पोहचविणे ही काळाची गरज आहे.”
पोलीस पाटील किरण किर्ते म्हणाले, “कला, क्रीडा, शालेय, संस्कार अशा विविध कला गुणांतून आपण आपली भावी पिढी घडवून समाजाचा नावलौकिक मिळवून देऊन प्रत्येक दिवस हा लढाईचा व शौर्यदिन असेन. आपल्या समाजासाठी जास्तीत जास्त योगदान देण्याचा प्रयत्न करूया व उज्वल भारताच्या यशामध्ये आपण छोटा खारीचा वाटा उचलूया.”
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ म्हस्के, सुनंदाताई शिंदे, सिंधूताई गजशिव, पत्रकार हनुमंत भेदे, अंगणवाडी सेविका कविताताई म्हस्के, सुदामतीताई टोपे, जयश्रीताई बचुटे, जेष्ठ कलावंत बुवाजी टोपे, दगडू बचुटे, कृष्णा गायकवाड, विनायक टोपे, विनायक भोसले, शांताबाई जोगदंड, युवराज जोगदंड, बाळू बचुटे ( जावईबापू ), अभिषेक गोरडे, अजय जोगदंड, अमोल गायकवाड, सतीश वैराग, प्रवीण म्हस्के, किरण गवळी, राहुल तिवडे, विजय वाघमारे, सतीश चौगुले, तसेच भीमक्रांती सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष नवनाथ म्हस्के यांनी सर्वांचे स्वागत करून सूत्रसंचालन केले, तर कविताताई म्हस्के यांनी आभार मानले.
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
This website uses cookies.