महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज नव्याने ४९ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून तालुक्यात १८१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राजगुरूनगर व चाकणला सर्वाधिक रुग्ण आढळले असून ग्रामीण भागात २९ रुग्णांची भर पडली आहे. चाकण परिसरातील नाणेकरवाडी येथील ७० वर्षीय पुरुष व आंबेठाण येथील ५३ वर्षीय महिलेचा १६ ऑगस्टला पवना हॉस्पिटल मध्ये उपचार चालू असताना मृत्यू झाला आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता २१७९ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील मागील २४ तासातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
————————————————————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २० ) : राजगुरूनगर – ९, चाकण – ७, आळंदी – ४,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण २९ ) : बोरदरा ४, आखरवाडी ४, निघोजे ३, येलवाडी, मोई, चिंबळी, शेलपिंपळगाव, मरकळ व दौंडकरवाडी या सहा गावात प्रत्येकी २, तर कान्हेवाडी, नाणेकरवाडी, सावरदरी, मेदनकरवाडी, गोलेगाव व काळुस या सहा गावात प्रत्येकी १ रुग्ण.
# आजची एकूण रुग्ण संख्या – ४९
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या २१७९
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ५५
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ३१२
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – १८१२
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : राजगुरूनगर ९, चाकण ७.
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०२ ( १ पुरुष + १ महिला )
————
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.