महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. ६ सप्टेंबर ) : खेड तालुक्यात आज दिलासा देणारी बातमी असून आज तालुक्यात केवळ २२ रुग्ण आढळले आहेत, तसेच मागील दोन दिवसात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना कोरोना रुग्णांचा आलेख आज मात्र खाली आला आहे.
मागील आठवड्यात एकूण ६८१ रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात आजपर्यंत ४११८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज नगरपरिषद क्षेत्रात ९, तर ग्रामीण भागात १३ रुग्णांची भर पडली आहे. नगरपरिषद क्षेत्रात चाकणला ४, राजगुरूनगरला ५, तर ग्रामीण भागात १३ रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ३८७८ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ९ ) :
राजगुरूनगर – ५, चाकण – ४, आळंदी – ०,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण १३ ) :
शिरोली – ४, कोयाळी – २, तर गुळाणी, पूर, निमगाव, दोंदे, कडधे, खराबवाडी व कुरुळी या गावात प्रत्येकी १ रुग्ण
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – २२
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ३८७८
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ८७
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ६७३
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ३११८
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : शिरोली – ४,
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
This website uses cookies.