महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. २१ ऑगस्ट ) : खेड तालुक्यात आज नव्याने ५४ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून निघोजे येथील ५६ वर्षीय महिलेचा वायसीएम रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यू झाला आहे. तालुक्यात १९५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राजगुरुनगरला सर्वाधिक ९ रुग्ण आढळले असून ग्रामीण भागात तब्बल ३३ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता २३५६ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
———————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २१ ) : राजगुरूनगर – ९, चाकण – ६, आळंदी – ६,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ३३ ) : शिरोली ६, चऱ्होली खुर्द ६, सांगुर्डी ५, दावडी ३, गोलेगाव ३, कुरुळी २, शेलपिंपळगाव २, तर काळेचीवाडी, तुकाई भांबुरवाडी, येलवाडी, रासे, काळुस व वडगाव घेनंद या ६ गावात प्रत्येकी १ रुग्ण.
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ५४
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या २३५६
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ६३
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ३३९
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – १९५४
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : राजगुरूनगर ९,
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०१ महिला ( वय ५६, रा. निघोजे )
————
बुधवार, १७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ मोठे…
रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…
शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…
शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…
गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…
बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…
This website uses cookies.