महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. ३० ऑगस्ट ) : खेड तालुक्यात आज तब्बल नव्याने १२२ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून तालुक्यात २४९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात ५६ तर ग्रामीण भागात ६६ रुग्णांची भर पडली आहे. राजगुरूनगर, चाकण, आळंदी व खराबवाडीत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आज राजगुरूनगरला २०, आळंदीत १९, चाकणला १७ व ग्रामीणमध्ये खराबवाडीत सर्वाधिक १८ रुग्ण आढळले आहेत. मागील दोन दिवसात खराबवाडीने चाकण शहराला मागे टाकले आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ३१९७ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ५६ ) : राजगुरूनगर – २०, चाकण – १७, आळंदी – १९,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ६६ ) : खराबवाडी १८, मेदनकरवाडी ९, चास ४, निघोजे ३, गोलेगाव ३, महाळुंगे इंगळे २, नाणेकरवाडी २, चिंबळी २, भोसे २, मरकळ २, राक्षेवाडी २, शिरोली २, वेताळे २, तर आंबेठाण, खालुंब्रे, कडाचीवाडी, वडगाव घेनंद, धानोरे, चिंचोशी, बुट्टेवाडी, खरपुडी खुर्द, पापळवाडी, कडुस, वाफगाव, गोसासी व जऊळके खुर्द या १३ गावात प्रत्येकी १ रुग्ण
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – १२२
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या ३१९७
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ७४
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ६६८
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – २४५५
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : राजगुरूनगर – २०, आळंदी – १९, खराबवाडी – १८, चाकण – १७, मेदनकरवाडी – ९
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…
मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…
This website uses cookies.