कोरोना

कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. ३० ॲागष्ट २०२० ) – राजगुरूनगर, चाकण, आळंदी, खराबवाडीत सर्वाधिक रुग्ण

 

खेड तालुक्यात आज कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट
तालुक्यात आज तब्बल १२२ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, एकूण रुग्णांची संख्या ३१९७,
नगरपरिषद हद्दीत ५६, तर ग्रामीण भागात ६६ रुग्णांची वाढ,
२४५५ रुग्ण बरे होऊन गेले घरी

 

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. ३० ऑगस्ट ) : खेड तालुक्यात आज तब्बल नव्याने १२२ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून तालुक्यात २४९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात ५६ तर ग्रामीण भागात ६६ रुग्णांची भर पडली आहे. राजगुरूनगर, चाकण, आळंदी व खराबवाडीत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आज राजगुरूनगरला २०, आळंदीत १९, चाकणला १७ व ग्रामीणमध्ये खराबवाडीत सर्वाधिक १८ रुग्ण आढळले आहेत. मागील दोन दिवसात खराबवाडीने चाकण शहराला मागे टाकले आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ३१९७ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

 

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ५६ ) : राजगुरूनगर – २०, चाकण – १७, आळंदी – १९,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ६६ ) : खराबवाडी १८, मेदनकरवाडी ९, चास ४, निघोजे ३, गोलेगाव ३, महाळुंगे इंगळे २, नाणेकरवाडी २, चिंबळी २, भोसे २, मरकळ २, राक्षेवाडी २, शिरोली २, वेताळे २, तर आंबेठाण, खालुंब्रे, कडाचीवाडी, वडगाव घेनंद, धानोरे, चिंचोशी, बुट्टेवाडी, खरपुडी खुर्द, पापळवाडी, कडुस, वाफगाव, गोसासी व जऊळके खुर्द या १३ गावात प्रत्येकी १ रुग्ण
#
आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – १२२
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या ३१९७
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ७४
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ६६८
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – २४५५
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : राजगुरूनगर – २०, आळंदी – १९, खराबवाडी – १८, चाकण – १७, मेदनकरवाडी – ९
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 20 Oct 2026

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…

10 hours ago

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

1 day ago

MahaBulletin — 18 Oct 2026

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…

2 days ago

MahaBulletin — 13 Oct 2026

सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…

1 week ago

MahaBulletin — 12 Oct 2026

रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेड…

1 week ago

MahaBulletin — 09 Oct 2026

बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 दुष्काळी…

2 weeks ago

This website uses cookies.