महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज नव्याने ६४ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून खेड तालुक्याने कोरोना रुग्णांचा २ हजाराचा टप्पा पार केला आहे. राजगुरूनगर, चाकण व आळंदीत सर्वाधिक रुग्ण आढळले असून ग्रामीण भागात ३६ रुग्णांची भर पडली आहे. निघोजे येथील ८८ वर्षीय वृद्धाचा स्टार हॉस्पिटल आकुर्डी येथे मृत्यू झाला आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता २०१० झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :– —————————————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २८ ) : राजगुरूनगर – १०, चाकण – ९, आळंदी – ९,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ३६ ) : सावरदरी ६, कोयाळी ५, सोळू ५, निघोजे ४, मोई ४, चऱ्होली ३, वाकी खुर्द २, तर चांडोली, वडगाव पाटोळे, कडुस, सिद्धेगव्हाण, केळगाव, पूर व वाडा या ७ गावात प्रत्येकी १ रुग्ण.
# आजची एकूण रुग्ण संख्या – ६४
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या २०१०
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ५१
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – २७५
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – १६८४
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : राजगुरूनगर १०, आळंदी – ९, चाकण ९.
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०१ पुरुष ( वय ८८, रा. निघोजे )
मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
रविवार, १२ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भीमाशंकर…
शनिवार, ११ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भेसळयुक्त…
शनिवार, ११ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 मँगो…
शुक्रवार, १० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 बालकाची…
गुरुवार, ९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिलीप…
This website uses cookies.