महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : ( दि. २० सप्टेंबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने ११० कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज आळंदी शहर हॉट स्पॉटवर असून आज शहरात सर्वाधिक २३ रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून तालुक्यात ४७९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात ५१, तर ग्रामीण भागात ५९ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ८६६ असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ५७९२ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ५१ ) : राजगुरूनगर – १०, चाकण – १८, आळंदी – २३,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ५९ ) :
# ४ पेक्षा जास्त रुग्ण आढळलेली गावे :- म्हाळुंगे इंगळे – ८, खराबवाडी – ५, मेदनकरवाडी – ५, बहुळ – ४
# ३ रुग्ण आढळलेली गावे :- शेलपिंपळगाव, चास
# २ रुग्ण आढळलेली गावे :- दोंदे, आंबेठाण, निघोजे, कोये, टाकळकवाडी, काळुस
# १ रुग्ण आढळलेली गावे :- चांडोली, कडुस, बिरदवडी, कडाचीवाडी, कुरुळी, नाणेकरवाडी, राक्षेवाडी ( चाकण ), वासुली, होलेवाडी, खरपुडी खुर्द, मांजरेवाडी, राक्षेवाडी ( रा. नगर ), सांडभोरवाडी, सातकरस्थळ, तुकाई भांबुरवाडी, कोयाळी, मरकळ, शेलगाव, वाफगाव
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ११०
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ५७९२
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १३०
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ८६६
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ४७९६
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : आळंदी – २३, चाकण – १८, राजगुरूनगर – १०, म्हाळुंगे इंगळे – ८
# मयत झालेल्या व्यक्ती : ०
सोमवार, ३ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
रविवार, २ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 धरण…
शुक्रवार, ३१ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आज…
गुरुवार, ३० जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
मंगळवार, २८ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…
रविवार, २६ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नीट…
This website uses cookies.