महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. १ सप्टेंबर ) : खेड तालुक्यात आज तब्बल नव्याने ९२ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून आज चाकण, चऱ्होली खुर्द व तुकाई भांबुरवाडी येथील तिघांचा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला आहे. तालुक्यात २५९९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात ३६ तर ग्रामीण भागात ५६ रुग्णांची भर पडली आहे. राजगुरूनगरला सर्वाधिक १९ रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ३३४६ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ३६ ) : राजगुरूनगर – १९, चाकण – ९, आळंदी – ८,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ५६ ) : भोसे ९, खराबवाडी ६, नाणेकरवाडी ५, चिंबळी ५, मेदनकरवाडी ४, शेलपिंपळगाव ४, कुरुळी ३, बहुळ ३, कोयाळी ३, म्हाळुंगे इंगळे २, खालुंब्रे २, सोळु २, तर बिरदवडी, निघोजे, वाकी खुर्द, चऱ्होली खुर्द, मरकळ, रासे, चांडोली, तुकाई भांबुरवाडी या ८ गावात प्रत्येकी १ रुग्ण.
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ९२
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ३३४६
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ७९
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ६६८
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – २५९९
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : राजगुरूनगर – १९
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०३ पुरुष ( वय ७५, चऱ्होली खुर्द, वय ६४, चाकण, वय ६२, तुकाई भांबुरवाडी )
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…
मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…
This website uses cookies.