कोरोना

कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. २८ ॲागष्ट २०२० ) धक्कादायक : खेड तालुक्यात आज रुग्णांच्या संख्येने केले शतक पार. तालुक्यात आज तब्बल ११६ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, एकूण रुग्णांची संख्या २९३७, चाकण, आळंदी, खराबवाडी, मेदनकरवाडी व राजगुरूनगरला सर्वाधिक रुग्ण

 

धक्कादायक : खेड तालुक्यात आज रुग्णांच्या संख्येने केले शतक पार.
तालुक्यात आज तब्बल ११६ नवीन कोरोना रुग्णांची वाढ,
एकूण रुग्णांची संख्या २९३७,
चाकण, आळंदी, खराबवाडी, मेदनकरवाडी व राजगुरूनगरला सर्वाधिक रुग्ण,
नगरपरिषद हद्दीत ४३, तर ग्रामीण भागात ७३ रुग्णांची वाढ,
२२९३ रुग्ण बरे होऊन गेले घरी

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. २८ ऑगस्ट ) : खेड तालुक्यात कोरोना रुग्णांनी आज शतक पार केले असून आज तब्बल नव्याने ११६ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून तालुक्यात २२९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात ४३ तर ग्रामीण भागात ७३ रुग्णांची भर पडली आहे. राजगुरूनगर, चाकण, आळंदी, मेदनकरवाडी व खराबवाडीत सर्वाधिक रुग्ण आढळले असून आज आळंदीत सर्वाधिक २० व ग्रामीणमध्ये खराबवाडीत सर्वाधिक १४ रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता २९३७ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

 

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ४३ ) : राजगुरूनगर – १०, चाकण – १३, आळंदी – २०,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ७३ ) : खराबवाडी १४, मेदनकरवाडी १०, मरकळ ५, चिंबळी ५, कनेरसर ५, धानोरे ४, भोसे ४, वाकी बुद्रुक ४, आंबेठाण ३, केळगाव २, कुरुळी २, खालूंब्रे २, पिंपरी बुद्रुक २, तर शेलपिंपळगाव, काळुस, निघोजे, ढोरे भांबुरवाडी, नाणेकरवाडी, तुकाई भांबुरवाडी, मोहकल, चास, मिरजेवाडी, रेटवडी व कडुस या ११ गावात प्रत्येकी १ रुग्ण.
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ११६
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या २९३७
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ७२
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ५७२
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – २२९३
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : आळंदी – २०, खराबवाडी – १४, आळंदी – १०, मेदनकरवाडी – १०
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०
————

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

3 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

4 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

4 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

1 month ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 month ago

This website uses cookies.