कोरोना

अण्णा हजारेंच्या गावात कोरोनाची एन्ट्री,सहाजण पॉझिटिव्ह

महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
राळेगणसिद्धी : जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी ( जि. अहमदनगर ) गावात कोरोनाने प्रवेश केला असून गावात कोरोनाचे सहा रुग्ण आढळले आहेत. गावातील सहाजणांचा खाजगी लॅबमधील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
आज येथे आढळलेले रूग्ण हे मुंबई येथील आहेत. ते कोरोनामुळे राळेगणसिद्धी येथे आले आहेत. मात्र, त्यांच्या एका नातेवाईकाचे निधन झाल्याने ते दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी गेले होते.
गावात आल्यानंतर त्यांना गावातीलच शाळेत क्वारंटाइनही केले होते. त्या दरम्यान त्यांचे स्वॅब घेण्यात आले. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यासह पारनेर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येत वाढत असून आज अहमदनगर जिल्ह्यात तब्बल ३४१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 02 Oct 2026

गुरुवार, १ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 दिव्यागर…

5 hours ago

MahaBulletin — 01 Oct 2026

बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

1 day ago

MahaBulletin — 30 Sep 2026

मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

2 days ago

MahaBulletin — 29 Sep 2026

सोमवार, २८ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…

3 days ago

MahaBulletin — 27 Sep 2026

शनिवार, २६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 दुष्काळ…

5 days ago

MahaBulletin — 26 Sep 2026

गुरुवार, २४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नवीन…

6 days ago

This website uses cookies.