कोरोनावर मात करुन घरी परतणाऱ्या रुग्णाचे डीजे लावुन स्वागत करणाऱ्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल

लोणीकाळभोर मधील घटना
महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
हडपसर : कोरोनाच्या उपचारानंतर घरी परतणाऱ्या लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या एका माजी सदस्याचे स्वागत, विनामास्क व डिजे तालावर सोशल डिस्टन्सिंग न पाळता मोठ्या उत्साहात करणे ही बाब रुग्णांसह नातेवाईकांना चांगलीच महागात पडली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी उमेश उर्फ टक्या निवृत्ती राखपसरे या कोरोनाचे उपचार घेऊन घऱी परतणाऱ्या रुग्णासह त्याचे स्वागत करणाऱ्या पंधराहून अधिक नातेवाईकांच्या विरोधात राष्ट्रीय आपत्ती कायदा व कोविड 19 उपाय योजना 2020 चे कलम 11 साथीचा रोग प्रतिबंधक 1897 कलमाअंतर्मगत गुन्हा दाखल केला आहे. यामुळे यापुढील काळात विनामास्क रुग्णांचे स्वागत करणाऱ्या नातेवाईकांबरोबर रुग्णालाही तुरुगांची वारी करावी लागणार आहे.
लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य उमेश राखपसरे यांना कोरोनाची लागण झाल्याने, राखसपरे यांच्या मागील दहा दिवसांपासून हडपसर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार चालू होते. कोरोनाचे उपचार संपल्यानंतर, उमेश राखपसरे बुधवारी (ता. १) सायंकाळी घऱी परतले. घऱी परतल्यावर उमेश राखपसरे यांच्या नातेवाईकांनी उमेश यांचे स्वागत डिजे लाऊन, अगदी नाचुन गाऊन केले होते. या स्वागत करतानाचा व्हायरल झालेला व्हिडीओ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या हाती लागला होता. यात स्वागताच्या वेळी नाचगाणी करतांना सोशल डिस्टन्सींग व मास्कचा वापर केला नसल्याचे आढळुन आल्याने बंडगर यांनी वरील गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
याबाबत अधिक माहिती देतांना पोलिस निरीक्षक सुरज बंडगर म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग नागरीकांना घऱाबाहेर पडण्यापुर्वी मास्कचा वापर करण्याबरोबरच, गर्दीत सोशल डिस्टन्सींग पाळा या दोन प्रमुख सुचना करत आहे. मात्र उमेश राखपसरे हा कोरोनाचे उपचार घेऊन परतल्याचे माहित असतानाही, नागरिकांनी स्वागताच्या वेळी मास्कचा वापर केला नसल्याचे व सोशल डिस्टन्सिंगला पायदळी तुडवल्याचे दिसून येत आहे. ही बाब गंभीर असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या उमेश राखपसरे याच्यासह त्याच्या पंधराहुन अधिक नातेवाईकांना लवकरच अटक केली जाणार आहे. यापुढील काळात वरील प्रकारावर आळा घालण्यासाठी पोलिस अधिक सतर्क राहणार असून, नागरिकांनी आपआपली काळजी घ्यावी, असे आवाहन सुरज बंडगर यांनी केले आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.